सतत Busy राहण्याच्या सवयीचे ‘हे’ 3 धोके, लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी, वेळीच व्हा सावध !

पोलीसनामा ऑनलाइन –  मी दिवसभर बीझी असतो, असे अनेकजण नेहमीच सांगतात असतात. बीझी असणं हे एक मोठेपणाचे लक्षणसुद्धा मानले जाते. कामासाठी वेळ पुरत नाही, वेळ कमी पडतो, इतके काहीजण बीझी असतात. बीझी रहाणे हे प्रगतीचे लक्षण असले तरी यातून काही समस्यादेखील निर्माण होण्याचा धोका असतो. सतत बीझी राहील्याने काही आजार डोकं वर काढू शकतात. हे सतत बीझी असणं आणि स्वत:कडे सुद्धा लक्ष न देणे यातून कोणत्या समस्या उद्भवतात, ते जाणून घेवूयात.

हे आहेत धोके

1 मानसीक आणि भावनिकदृष्या सतत बीझी असणे हे धोकादायक आहे.

2 सतत कामात बीझी राहण्याची सवय असेल तर कमी वयात सुद्धा नकळतपणे मानसीक आजार होऊ शकतात.

3 नेहमी ताण-तणाव, सतत चिंता करणे आणि घाईत असणे हे शरीरासाठी घातक ठरू शकते.

हे लक्षात ठेवा

* स्वतःला जर खूप व्यस्त ठेवत असाल तर त्याला काही मर्यादा असायला हव्यात.

* जास्त कामात गुंतून न जाता स्वतःकडे लक्ष देणं सुध्दा तितकचं महत्वाचे आहे.

* आपल्या कामातून थोडासा वेळ काढून गाणी ऐकणे, चांगल्या कथा वाचणे, स्वतःशी गप्पा मारणे अशा एक्टीव्हीटीज करायला हव्यात.

* व्यायाम करायला हवा तसेच योगा करणेसुद्धा फायदेशीर आहे.

* तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांच्यातल्या संबंधाचा ताळमेळ ठेवून आपण जीवन जगायला हवे.