पुण्यातील महिलेनं केलं ‘इमोशनल ब्लॅकमेल’, ‘डायरेक्ट’ पोलिसाला 30 लाखचं मागितले

पुणे (बारामती) : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने एका पोलिसाला इमोशनल ब्लॅकमेल करत 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, आपण एकत्र राहू, तु माझ्यासोबत राहिला नाहीस तर मी आत्महत्या करेन अशी धमकी देत महिलेने खंडणीची मागणी केली. या महिलेविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या संजय बबन कोठावळे (मूळ रा. जेऊर-दहीगाव रस्ता, जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापूर) या कर्मचाऱ्याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी महिला ही हडपसरमधील ससाणेनगर येथील रहिवाशी आहे. ही घटना 9 सप्टेंबर 2019 ते 16 ऑक्टोबर 2019 या कालावधीत फिर्यादीच्या मूळ गावी तसेच बारामतीत घडल्याचे फिर्यादेत म्हटले आहे. आरोपी महिला हडपसर येथे रहात असली तरी ती मूळची करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथील रहिवाशी आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेने फिर्यादी यांना तिच्या मोबाईलवरून संपर्क साधून माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर, नाही तर मी आत्महत्या करेन. तुझ्यासाठी मी पतीला सोडून दिले आहे. असे वेळोवेळी बोलून दाखवले. तसेच हात कापल्याचे, औषध कपामध्ये ओतून पित असल्याचे फोटो फिर्यादीला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले. आपण दोघे एकत्र राहू असे म्हणत तिने फिर्यादीकडे फ्लॅट घेण्यासाठी 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

You might also like