केसगळती अन् कोंड्याच्या समस्येनं हैराण आहात ? केस धुण्याच्या 20 मिनिट आधी करा ‘हा’ सोपा घरगुती उपाय !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्याच्या वातावरणात केस गळण्याच्या अनेक समस्या येतात. धूळ, प्रदूषण, शरीराला आवश्यक पोषक घटक न मिळणं अशा अनेक कारणांमुळं केसगळतीची समस्या येते. जर तुम्हाला घरात राहूनही केसगळतीच्या समस्या येत असतील तर तुम्ही यावर काही घरगुती उपायदेखील करू शकता. यासाठी तुम्हाला बटाट्याच्या रसाचा वापर करावा लागेल. याचबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. कोंड्याचीही समस्या तुम्ही सहज दूर करू शकाल आणि लांब काळेभोर मजबूत केस मिळवाल.

बटाट्याचे केसांना होणारे फायदे
1) जर तुम्ही कोंड्याच्या समस्येनं हैराण झाला असाल तर बटाट्याचा रस घ्या आणि तो स्काल्प व केसांना लावा. 20 मिनिटे किंवा तासाभरानं केस थंड पाण्यानं धुवून घ्या. यामुळं केस स्वच्छ मजबूत आणि काळेभोर होतील आणि कोंड्याची समस्याही दूर होईल.

2) केसांना सुंदर, काळंभोर ठेवण्यासाठी बटाट्याचा खूप फायदा होतो. ज्यांना केस गळण्याची समस्या जाणवते त्यांनी बटाट्याचा वापर केला तर फायदा होईल. यामुळं केसांची वाढ चांगली होते. बटाट्यात असलेलं व्हिटॅमिन सी, आयर्न आणि व्हिटॅमिन बी केसांना बळकटी देतं. याचा वापर केसांवर केला तर रक्ताभिसरण चांगलं होतं आणि केस गळणंही बंद होतं.

3) कच्च्या बटाट्याच्या रसात अँटी इंफ्लेमेटरी म्हणजेच दाहशामक गुणधर्म असतात. कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण महगडे शॅम्पू वापरतात. याऐवजी हा सोपा घरगुती उपाय आहे. बटाट्याचा रस घ्या आणि तो स्काल्प व केसांना लावा. 20 मिनिटे किंवा तासाभरानं केस थंड पाण्यानं धुवून घ्या. यामुळं केस स्वच्छ, मजबूत आणि काळेभोर होतील आणि कोंड्याची समस्याही दूर होईल.

‘असा’ तयार करा बटाट्याचा रस
– सर्वात आधी एक मध्यम आकाराचा बटाटा घ्या.
– आता बटाटा किसून त्याचा रस गाळून घ्या
– बटाट्याचा रस हातानं पिळून घेतला तरी चालेल
– एका भांड्यात बटाट्याचा रस काढल्यानंतर तो कापसानं किंवा हातानं केसांच्या मुळांना लावा.
– संपूर्ण डोक्याला व्यवस्थित हा रस लागेच याची काळजी घ्या.
– 20 मिनिटांनंतर केस धुवून घ्या.
– आठवड्यातून 2 वेळा हा प्रयोग केल्यास फरक नक्की दिसेल.

मऊ मुलायम केसांसाठी असा वापरा बटाटा
– 1-2 बटाटे किसून घ्या
– यात मध आणि अंड्याचा पिवळा भाग मिसळा.
– तयार झालेली पेस्ट केसांना लावा.
– हा हेअर पॅक सुकल्यानंतर शॅम्पूनं केस स्वच्छ धुवून घ्या.
– केस धुताना जर कोमट पाणी वापरलं तर चांगलं राहिल.

कोंड्याची समस्या असेल तर असा वापरा बटाट्याचा रस
– केसांमधील कोंड्याचा त्रास दूर करायचा असेल तर बटाट्याच्या रसात दही आणि लिंबाचा रस मिक्स करा.
– हा पॅक केसांना मुळासकट लावा
– 2 तासांनंतर केस शॅम्पूनं धुवून घ्यावेत.
– आठवड्यातून 2-3 वेळा हा प्रयोग केल्यास कोंड्याची समस्या दूर होईल.

लांब केसांसाठी असा वापरा बटाटा
– बटाट्याचा रस घ्या
– यात कोरफडीचा रस मिक्स करा
– आता तयार पॅक केसांना लावा.
– हेअर पॅक पूर्ण सुकल्यानंतर केस थंड पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या.
– यामुळं दीर्घकाळ केसांचं सौंदर्य टिकून राहण्यास मदत होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.