वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या प्रमुख समस्यांची पुस्तिका जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांना सादर

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगांव शहर विकास समितीच्या वतीने प्रमुख समस्यांचे निवेदन जि. प. कार्यकारी अधिकरी श्रीमती लिना बनसोड यांना सादर करण्यात आले व त्या निवेदन पुस्तिकेच्या ना छगनराव भुजबळ, ना. दादाजी भुसे, खा. भारतीताई पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेेब क्षिरसागर साहेब यांना समक्ष भेटुन देण्यात आल्या.

या निवेदनात सोळा गाव समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराच्या सर्वच भागात उशिराने व अशुध्द स्वरूपाचा पाणी पुरवठा होतो, तुंबलेल्या गटारी आणि ड्रेनेज ची निकृष्ट व्यवस्था, शहरांमधील, आदिवासी हौसिंग सोसायटी, पिंजार गल्ली, निमगांव रोड ,सर्व्हे नं. ९३ व ९४ या ठिकाणी असणार्या सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था, घंटा गाड्या ह्या वेळेवर न येत असल्याने दुर्गंधी सुटुन शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, ग्रामपंचायती मार्फत झालेल्या गांव अंतर्गत रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने सदर रस्त्यावर अनेक ठिकानी खड्डे पडले असून त्याच्या साईड पट्ट्या देखिल न भरल्याने छोटे-मोठे अपघात होत आहे.

मोकाट जनावारांचा उद्रेक, शहर परिसरामध्ये भाजीपाला फळे विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून अवास्तव स्वरूपाचे पैसे वसूल करण्याचे काम सुरू आहे सदर पैशाची कोणत्याही स्वरुपात पावती दिली जात नाही तसेच सदरच्या शेतकर्यांना शिवीगाळ अरेरावीपणा तसेच दांडगाई केली जाते आहे, ग्रामसेवक हे मुख्यालयी रहात नसल्यामुळे ते कामावर वेळेवर हजर राहत नाही. नागरीकांनी काही तक्रारी त्यांच्याकडे घेऊन गेले असता ते नागरीकांशी उध्दटपणे बोलतात व बेजबादार पणे वक्तव्य करतात या समस्येसाठी लासलगाव शहर विकास समितीकडून निवेदन देण्यात आले आहे.

याप्रसंगी सचिन होळकर, प्रकाश पाटील, प्रविण कदम, विकास कोल्हे, शितल साबद्रा, अभय जांगडा, धर्मेश जाधव, अफजल शेख, अनिल आब्बड, बबनराव शिंदे, प्रमोद पाटील, राजेंद्र कराड, राजेंद्र जाधव, संदिप उगले, महेंद्र हांडगे, महेश बकरे, दिनेश जोशी, मयुर झांबरे, संकेत वाळेकर, संतोष पवार, ललीत पानगव्हाणे, रोहित पाटील, बाळासाहेब दराडे, सुरेश कुमावत, देवेंद्र भावसार, विलास कांगणे, गणेश राठी, अनिल बोराडे, मोहन आव्हाड, दिपक परदेशी, संदिप गोमासे, राजाभाऊ मुनोद, ओमप्रकाश व्यास, मुन्ना शेख, अन्वर शेख, महेश मोरे व नागरीक उपस्थित होते.