सोशल मीडियावर व्हायरल होतोय Zomato च्या डिलिवरी बॉयचा व्हिडीओ, चेहर्‍यावरील हास्यानं सर्वांची मनं जिंकली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लाखापेक्षा जास्त फॉलोवर असलेल्या झोमॅटो इंडियाचे ट्विटर अकाऊंटचा प्रोफाइल फोटो बदलताच सोशल मीडियावर जोरदार चर्च सुरु झाली. हा फोटो व्हायरल होणाऱ्या झोमॅटो डिलेव्हरी बॉयच्या व्हिडिओचा स्क्रीन शॉट आहे. हा व्हिडिओ सर्वात आधी TikTok च्या danishansari81 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला, ज्यानंतर सोशल मीडियावर फेसबूक, ट्विटरवर, इंस्टाग्रामवर हा फोटो वेगाने व्हायरल व्हायला लागला.

https://twitter.com/ZomatoIN/status/1233313204039639041

सोनूची हृदय जिंकणारी स्माईल –
या व्हिडिओमध्ये डिलीवरी बॉय अत्यंत पॉजिटिव्ह असल्याचे दिसतो, व्हिडिओमध्ये बोलताना त्यांची स्माईल कायम असते. त्यामुळे त्यांच्या स्माईलने सर्वांचे मन जिंकले. या व्हिडिओमध्ये सोनू दानिशच्या काही प्रश्नांची उत्तरं देत आहे.

जेव्हा दानिश सोनूच्या कमाईबद्दल विचारतो तेव्हा तो सांगतो की तो 12 तास काम करतो आणि इंसेंटिव्ह मिळून 350 रुपये कमावतो. यानंतर जेवणाबद्दल सोनू म्हणतो की, जी ऑर्डर कॅंसल होते ती त्याला मिळते. सोनू सांगतो की कंपनीकडून त्यांना कोणतीही समस्या नाही. कंपनी पैसे आणि जेवण दोन्ही वेळच्या वेळी देते.