Har Ghar Jal Campaign | ‘हर घर जल’ अभियान ! महाराष्ट्राचे 9 जिल्हे -1,500 पेक्षा जास्त गावातील प्रत्येक घरात पोहचले नळाचे स्वच्छ पाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Har Ghar Jal Campaign | महाराष्ट्रातील 1,513 गावांमधील प्रत्येक घरात गेल्या काही आठवड्यांत ’हर घर नल से जल’ अभियानांतर्गत नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका अधिकार्‍याने रविवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, 25 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग एका विशेष मोहिमेअंतर्गत राज्यातील 1,553 गावांमध्ये पोहोचला आणि तेथील सर्व घरांमध्ये नळाला पाणी पुरवठा करण्यात यशस्वी झाला. (Har Ghar Jal Campaign)

 

यावर जेजेएमचे मिशन डायरेक्टर म्हणाले…
महाराष्ट्रातील जल जीवन मिशन (जेजेएम) चे डायरेक्टर डॉ. हृषिकेश यशोद म्हणाले की, या योजनेअंतर्गत 2024 पर्यंत सर्व गावातील घरांना पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गावपातळीवर पाणीपुरवठा योजनेतून नळाला पाणी देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या जिल्ह्यांत पोहोचले पाणी
अधिकृत आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यातील 111, गडचिरोलीतील 89, सातारा 79, अमरावती 78, चंद्रपूर 76, नागपूर 65, जालना 52, औरंगाबाद 42 आणि पालघर मधील 17 गावांना नळाने पाणी पुरवठा करण्यात आला आहे.

 

यशोद यांच्या म्हणण्यानुसार, विभागाने जेजेएम मानदंडांनुसार 1,553 गावांमधील प्रत्येक घरात किमान 55 लिटर गुणवत्ता नियंत्रित आणि सतत पाणीपुरवठा करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

 

योजनेसाठी 11,500 कोटी रुपयांची तरतूद
दोन वर्षांपूर्वी, ’जल जीवन मिशन’ अंतर्गत, दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधील सर्व घरांना पाईपद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्याच्या योजनेसाठी 2020-21 मध्ये 11,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय म्हणाल्या
गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचे वाचन करताना सांगितले होते
की, सर्व घरांना पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने 3.60 लाख कोटी रुपयांची जल जीवन अभियान योजना मंजूर करण्यात आली आहे.
या योजनेत स्थानिक जलस्रोत वाढवणे, विद्यमान स्त्रोतांचे जलभरण करणे यासारख्या उपक्रमांचा समावेश असेल.

 

चालू आर्थिक वर्षात दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल,
असेही त्या म्हणाल्या होत्या. या योजनेअंतर्गत, योजना 2020-21 या वर्षात 11,500 कोटी रुपयांची संसाधने देखील प्रदान केली जातील.

 

पाण्याची क्षारताही कमी केली जाईल
‘जल जीवन अभियाना’अंतर्गत पाणी साठवणीबरोबरच पाण्याची क्षारता कमी करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देणार आहे.
गेल्या आर्थिक वर्ष 2019-20 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात यासाठी 10,000.66 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

 

Web Title :- Har Ghar Jal Campaign | har ghar jal campaign clean tap water reaches every household more than 1500 villages 9 districts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Healthy Fats | डायबिटीजमध्ये लाभदायक आहे ऑलिव्ह ऑईल, जाणून घ्या इतर हेल्दी फॅट्सचे लाभ

 

Tulsi che Fayde | ‘या’ 5 आजारांच्या उपचारात अतिशय प्रभावी आहेत तुळशीची पाने, शरीर बनवतात निरोगी

 

Weight Loss Drink | ‘या’ 2 वस्तू मिसळून बनवा स्पेशल हेल्दी ड्रिंक; वजन कमी करणे होईल अतिशय सोपे