Coronavirus : हरभजन सिंगचा मोठा खुलासा, म्हणाला – ‘कोरोना 2 वर्षापुर्वीच आला होता’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत क्रिकेटपटू हरभजन सिंगने धक्कादायक खुलासा केला आहे. कोरोना विषाणू दोन वर्षांपुर्वीच आला होता. त्याबाबत आपण एका कोरीयन चित्रपटात दोन वर्षांपुर्वीच याबाबतचा संवाद ऐकला होता. असा खुलासा करत त्याने एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

चीनमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, परंतु जागतिक आरोग्य संघटनेने तो कोणत्याही देशात किंवा धर्मात तयार होत नसल्याचे म्हटले आहे. पण कोरोनाची कुणकुण दोन वर्षांपुर्वीच लागली होती असे हरभजन सिंग म्हणाला आहे. हरभजन सिंगने 2018 मधील कोरीअन सिरीजचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या सिरीजचे ना माई सिक्रेट टेरियस असे नाव आहे. त्यात कोरोनाची भविष्यवाणी करण्यात आली होती. या व्हिडीओचा मुख्य भाग हरभजनने पोस्ट केला आहे.

 

काय म्हणाला हरभजन ट्विटमध्ये ?

या सर्व गोष्टी वेडेपणाच्या आहेत. जर तुम्ही घरात असाल तर नेटफ्लिक्सवर जा आणि माय सिक्रेट टेरियस च्या पहिल्या सीझनचा 10 वा एपीसोड पहा.या एपिसोडमध्ये 53 व्या मिनिटाला तुम्हाला कोरोना विषाणूबाबतचे संवाद ऐकायला मिळतील. ही सिरीज 2018 मधली आहे. आता 2020 आहे. त्यामुळे हे जर पुर्वनियोजित असेल तर नक्कीच धक्कादायक आहे. असे हरभजन म्हणाला आहे.

You might also like