प्रत्येक रात्री ‘देवीला पत्र’ लिहित होते PM मोदी, ‘या’ पुस्तकात छापली आहेत ‘ती’ पत्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तारूण्यवस्थेत असताना रोज रात्री देवीला एक पत्र लिहित असत. ते आपल्या पत्रात देवीचा उल्लेख ’जगत जननी’ असा करत असत. पीएम मोदी प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी हे पत्र लिहित असत. त्यांनी लिहिलेली ही पत्र आता हार्पर कॉलिंस इंडिया प्रकाशित करणार आहे. पत्राचे विषय वेगवेगळे असत. कधी ही पत्र दुख आणि आनंदाबाबत असत तर कधी आठवणींबाबत असत. ही पत्र मोदींच्या डायरीतून घेतली गेली आहेत.

1986 मध्ये लिहिली गेली पत्र
हार्परकॉलिन्स इंडियाने म्हटले की, प्रसिद्ध चित्रपट समीक्षक सोमय्या द्वारा गुजराती भाषेतून भाषांतरीत ’लेटर्स टू मदर’ चे ई-बुक आणि पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. ही पत्र 1986 मध्ये लिहिली असून ती मोदींच्या डायरीतून घेण्यात आली आहेत. हार्परकॉलिन्स इंडियाने मोदींचा संदर्भ देत म्हटले की, हा साहित्यिक लेखनाचा प्रयत्न नाही, या पुस्तकात सहभागी अंश माझ्या द़ृष्टीने आणि कधीकधी काटछाट न केलेल्या विचारांचा आरसा आहे.

पत्रात लिहित होते या गोष्टी
त्यांनी म्हटले की, मी लेखक नाही, आमच्यातील बहुतांश लोक लेखक नसतात, परंतु प्रत्येक जण आपले विचार मांडतो. जेव्हा हा विचार व्यक्त करण्याचा आग्रह प्रबळ होतो, तेव्हा कागद आणि पेन घेण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नसतो.

पत्र लिहिल्यानंतर काही महिन्यानंतर फाडून टाकत
हार्परकॉलिन्स इंडिया ने म्हटले, मोदींच्या लिखाणात तरूणांमध्ये उत्साह आणि परिवर्तन आणण्याची ताकद आहे. परंतु काही महिन्यानंतर ते ही पाने फाडून टाकत आणि ती जाळत असत. मात्र 1986 मध्ये लिहिलेल्या एका डायरीतील पाने वाचली होती. आता ती प्रथमच इंग्रजीत प्रकाशित केली जात आहेत. चित्रपटांवर अनेक पुस्तकं लिहिलेल्या भावना सोमय्या यांनी म्हटले, मला वाटतं, एका लेखकाच्या रूपात नरेंद्र मोदी यांच्या ताकदीचा हा भावनात्मक भाग आहे.