हर्षवर्धन पाटलांच्या काँग्रेस भवन मधील फोटोवर आज अखेरची ‘फुली’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपमध्ये प्रवेश केलेले जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या काँग्रेस भवन मधील फोटोवर आज अखेरची फुली पडली. सातत्याने आतबाहेर करणाऱ्या पाटील यांच्या नावावर काँग्रेसची अखेरची फुली असेल असेच तूर्तास दिसत आहे.

काँग्रेस सत्तेत असताना विविध मंत्रीपदे भूषवणारे हर्षवर्धन पाटील काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसवासी झाले आहेत. केवळ इंदापूर ची जागा सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. त्यामुळे काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक कार्यकर्ते अगदी छोट्या पदांसाठी तरसत असताना पाटील यांच्या शब्दाखातर अनेकांना संधी गमवावी लागली होती. त्यामुळेच केवळ निवडणुकीसाठी पाटील यांनी पळ काढला असा रोष कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पाटील यांच्या भाजप प्रवेशनांतर काँग्रेस भवन मधील जिल्हा कार्यालयातून पाटील यांचा फोटो काढून टाकण्यात आला होता. परंतु सभागृहात असलेल्या शहर कार्यकरणीच्या फ्लेक्सवर मात्र सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत अगदी वरच्या रांगेत असलेला पाटील यांचा फोटो तसाच होता. आज काही कार्यकर्त्यांनी त्यावर काळ्या शाईने अखेर फुली मारली. ही फुली पाटील यांना भविष्यात पुन्हा काँग्रेस मध्ये घेऊ नका, याच उद्देशाने मारल्याची भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Visit – policenama.com 

You might also like