हरसिमरत कौर बादल केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचं ब्रेक अप झाल्यानंतर एनडीएतल्या काही मित्रपक्षांनी भाजपबद्दल आवाज उठवला होता. त्यातच भाजपचा जुना मित्र असलेल्या शिरोमणी अकाली दलाने दिल्लीच्या निवडणुकीत भाजपला साथ द्यायची नाही असे ठरवलंय. अकाली आणि भाजपमध्ये फूट पडल्यानंतर अकली दलाच्या केंद्रातील कॅबिनेट मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्यावर राजीनामा देण्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी दबाव टाकला आहे.

भाजपचे अकाली दलाकडे दुर्लक्ष
दरम्यान, भाजपकडून अकाली दलाला सहा जागा दिल्या नसल्याने अकाली दल राष्ट्रीय नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. परंतु भाजपने याकडे दुर्लक्ष केल्याने अकाली दलाला या निवडणूकीतून बाहेर पडावे लागले आहे.

अकली दलासाठी परिक्षेची वेळ
शिरोमणी अकाली दलाची ही कठीण परिक्षेची वेळ असून भाजप दिल्ली विधानसभा निवडणुकीत अकाली दलाला दूर ठेवून त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे भाजप पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढवून सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये अकाली दलाला आपल्याच पक्षातील कट्टर नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे.

हे नेते शिरोमणी अकाली दलाला बादल कुटुंबापासून मुक्त करण्याच्या निर्णयावर आडून बसले आहेत असून याला नेत्यांचा पाठिंबा वाढत आहे. जर अकाली दलाने भाजपची साथ दिली तर पंजाबमध्ये राजकीय विस्फोट होऊ शकतो असे मत नेत्यांचे आहे. दरम्यान या नेत्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री असलेल्या हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like