Hasan Mushrif | ‘…म्हणून चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) हे खूप नशीबवान आणि भाग्यवान नेते आहेत, केवळ 12 वर्षे सन्याशी म्हणून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या बरोबर पक्षाचे काम केले. तेवढ्यावर त्यांना महसूल, सहकार, बांधकाम अशी महत्त्वाची खाती मिळाली, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळेले, असा टोला राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पत्रकार परिषदेत लगावला आहे. 12 वर्षे संन्याशी म्हणून काम केल्यावर एवढे सारे मिळते हे माहीत असते तर मी पण केलं असतं, असा चिमटाही हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी काढला.

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. या आरोपाचे खरे बोलविते धनी चंद्रकांत पाटील असल्याचे सांगताना त्यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला. यामुळे चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 

चंद्रकांत पाटील यांच्यात धाडस नाही

मुश्रीफ पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटील हे धाडसी नाहीत. थेट आरोप करण्याचे त्यांचे धाडस झाले नाही. म्हणून त्यांनी सोमय्या यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. ते गृहमंत्री अमित शहा यांचे मित्र आहेत. त्यांच्या बरोबर संन्याशी म्हणून 12 वर्षे त्यांनी पक्षाचं काम केलं. या मैत्रीमुळेच त्यांना राज्यात अतिशय महत्त्वाची खाती मिळाली. रस्त्यांच्या कामात त्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर मी गुन्हा (FIR) दाखल करणार आहे.

दादा हे मुक्त विद्यापीठ
हसन मुश्रीफ म्हणाले, मागील काही दिवस ते आपल्या विरोधात माहिती गोळा करत होते.
सोमय्यांना माहिती पुरवत होते. याची कुणकुण आम्हाला लागली होती.
कारण दादा हे मुक्त विद्यापीठ असल्याने त्यांच्या पोटात काही राहत नाही.
हे कागदपत्र आले का, ते कागदपत्र आले का अशी विचारणा अनेकांसमोर ते करत होते, असे मुश्रीफ म्हणाले.

Web Titel :- Hasan Mushrif | ncp minister hasan mushrif criticizes bjp chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ICAI CA Result 2021 | सीए परीक्षेचा निकाल जाहीर, देशात नंदिनी अगरवाल पहिली

Beed Crime | संतापजनक ! पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून 7 महिन्याच्या गर्भवती महिलेची आत्महत्या

Single Use Plastic Ban | ‘या’ तारखेपासून बॅन होतंय सिंगल यूज प्लास्टिक, जाणून घ्या कोण-कोणत्या वस्तू होतील बंद