Coronavirus : उत्तरप्रदेशातील क्वारंटाईन सेंटरमधून फरार झाले 35 ‘कोरोना’चे संशयित, 29 जणांवर FIR दाखल

उत्तर प्रदेश :  वृत्तसंस्था –  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाची लक्षण आढळून येणाऱ्या व्यक्तीला क्वरंटाईन करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. तर केंद्र सरकारने देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातून एक खळबळजनक माहित समोर आली आहे. हाथरस जिल्ह्यातील क्वारंटाईन कक्षातून कोरोनाचे 35 संशयित रुग्ण पळून गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पळून गेलेल्या रुग्णांपैकी सहा रुग्ण परत आले असून 29 जणांवर एफआयआर दाखल केला आहे. हाथरस जिल्ह्यातील सदाबाद परिसरातील बिसावर शहराच्या प्राथमिक शाळेत इतर राज्यातील 35 संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्व लोक रात्री याठिकाणच्या कर्मचाऱ्यांना चकवा देऊन क्वारंटाईन कक्षातून पळून गेले. हा प्रकार प्रशासन अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पळून गेलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

हाथसर जिल्ह्यातील या क्वारंटाईन कक्षामध्ये इतर राज्यातून आलेल्या नागरिकांना प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. या लोकांच्या भोजन आणि इतर व्यवस्था करण्यासाठी जिल्हा सचिवांनी पंचायत सचिवांची ड्युटी लावली आहे. परंतु रात्री जेवणानंतर पंचायत सचिव शाळेतून निघून गेल्यानंतर या लोकांनी संधीचा फायदा घेत तेथून पळ काढला.

6 जण परत आले, 29 जणांविरुद्ध एफआयआर

क्वारंटाईन केंद्रातून पळून गेलेल्या लोकांपैकी 6 जण पुन्हा क्वारंटाईन कक्षात आले आले आहेत. तर उर्वरीत 29 जण फरार झाले आहेत. फरार झालेल्या लोकांवर जिल्हा दंडाधिकारी प्रविणकुमार लक्षकार यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत तर पंचायत सचिवांना तात्काळ निलंबित केले आहे.
हाथरसचे जिल्हाधिकारी प्रविणकुमार यांनी सांगितले की, हे लोक बाहेरच्या राज्यातून आले होते. हे सर्वजण आसपासच्या गावातीलच होते. त्यांनी संधीचा फायदा घेत क्वारंटाईन कक्षातून पलायन केले. परंतु पळून गेलेल्यांपैकी 6 जण पुन्हा परत आले आहेत. या प्रकरणात 29 लोकांवर एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले असून पंचात सचिवांना निलंबित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.