हाथरस प्रकरण : आरोपींवर खटला जलदगती न्यायालयात चालवा, आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन –  उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. याप्रकरणी विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची विधाने समोर आली आहेत. उत्तर प्रदेश मधील भारतीय जनता पक्षाच्या योगी सरकारला लक्ष्य केले जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या योगी आदित्यनाथ सरकारने तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला जात आहेत.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

14 सप्टेंबर रोजी हाथरस येथे 4 लोकांनी 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी मुलीची पाठीची कडी तोडली आणि तिची जीभ देखील कापली. 29 सप्टेंबर रोजी दिल्लीत उपचार सुरू असताना पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हाथरस येथील या घटनेबद्दल देशात संताप व्यक्त केला जात आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे ( सात/ ऑक्टोबर ) रोजी तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आरोपींना पाठीशी घालणारे अधिकारी व कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करावा आणि आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवावा.

अशी मागणी निवेदनात तहसील कार्यालयामार्फत महामहिम राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष शेख खालेद, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील उन्हाळे, पाथरी नगराध्यक्ष पती-नितेश भोरे, मुबारक चाऊस, गुलाम मुस्तफा, अजय सिंह पाथ्रीकर, संतोष वाकडे, शेख इरफान, आलोक चौधरी, रिंकू पाटील, अशोक ढगे, किरण भाले, हसीब खान, कलीम अन्सारी, शेख इरफान, अतुल जत्ती, अहेमद आतार, दगडू आमले पाटील, कार्तिक घुंबरे- पक्ष पदाधिकारी, न.प. सदस्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार संदीप साखरे यांना निवेदन देण्यात आले.