Ind vs Eng : टीम इंडिया पुढील वर्षी करणार इंग्लंडचा दौरा, समोर आला सीरीजचा संपूर्ण कार्यक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय क्रिकेट टीम पुढील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौर्‍याचा पूर्ण कार्यक्रम बुधवारी इंग्लंड क्रिकेट बोर्डद्वारे जारी करण्यात आला. भारताला पुढील वर्षी इंग्लंडमध्ये 5 टेस्ट मॅचेसची सीरीज खेळायची आहे. दौर्‍याची सुरूवात भारतीय टीम ट्रेंट ब्रिज टेस्टपासून 4 ऑगस्टला करेल. ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यानंतर इंग्लंडची यजमानी केल्यानंतर भारतीय टीम 5 मॅचेसची टेस्ट सीरीज खेळण्यासाठी इंग्लंडला जाईल.

भारत आणि इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणार्‍या टेस्ट सीरीजचा पूर्ण कार्यक्रम ठरला आहे. टेस्ट मॅचची तारीख आणि ठिकाणाची घोषणा बुधवारी झाली आहे. 4 ते 8 ऑगस्टच्या दरम्यान टीम इंडिया ट्रेंट ब्रिजमध्ये सीरीजची पहिली टेस्ट मॅच खेळेल. दुसरा सामना 12 ते 16 ऑगस्टच्या दरम्यान खेळला जाणार आहे, जो लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर होईल. हेडिंग्लेमध्ये दोन्ही टीम सीरीजच्या तिसर्‍या सामन्यात 25 ते 29 ऑगस्टच्या दरम्यान आमने-सामने असतील. तर 2 ते 6 सप्टेंबरच्या दरम्यान चौथी टेस्ट ओव्हलमध्ये खेळवली जाईल. इंग्लंडच्या दौर्‍यावर पाचवी आणि शेवटची टेस्ट ओल्ड ट्रॅफर्डमध्ये 10 ते 15 स्पटेंबरच्या दरम्यान होईल.

रताच्या 2021 इंग्लंड दौर्‍याचा कार्यक्रम

4 ते 8 ऑगस्ट (पहिली टेस्ट) ट्रेंट ब्रिज

12-16 ऑगस्ट (दूसरी टेस्ट) लॉर्डस

25 ते 29 ऑगस्ट (तिसरी टेस्ट) हेडिंग्ले

2 ते 6 सप्टेंबर (चौथी टेस्ट) ओव्हल

10 ते 14 सप्टेंबर (पाचवी टेस्ट) ओल्ड ट्रॅफर्ड

2021 मध्ये भारतीय टीमचा प्रस्तावित कार्यक्रम

–   पुढील वर्षी भारतीय टीमला फेब्रुवारीमध्ये इंग्लंडच्या विरूद्ध घरीच 5 टेस्ट मॅचेसची सीरीज खेळायची आहे.

–   मार्चमध्ये तीन वन-डे मॅचेसची सीरीज खेळण्यासाठी अफगाणिस्तानची टीम भारतात येईल.

–   जुलैमध्ये भारतीय टीम श्रीलंकेच्या दौर्‍यावर तीन टी20 सामने खेळेल. यानंतर इंग्लंडच्या दौर्‍यावर 5 टेस्ट मॅचेसची सीरीज खेळण्यासाठी रवाना होईल.

–   ऑक्टोबरमध्ये साऊथ अफ्रीकेची टीम भारताचा दौरा करेल, जेथे त्यांना 3 वन-डे आणि तेवढेच टी20 सामने खेळायचे आहेत.

–   ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान टी20 विश्व कपचे आयोजन भारतात होणार आहे.

–   नोव्हेंबरमध्ये भारताला न्यूझीलंडसोबत घरीच 2 वन-डे मॅच खेळायच्या आहेत.

–   वर्षाचा समारोप साऊथ अफ्रीकेच्या दौर्‍याने होईल.

(हा भारतीय टीमचा प्रस्तावित कार्यक्रम आहे, ज्यामध्ये बदल केला जाऊ शकतो.)