Sinusitis and Pollution : वायु प्रदूषणामुळे सायनसचा धोका, ‘या’ आजाराचा सामना करण्यासाठी जाणून घ्या 6 उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हवा दुषित गॅसची चेंबर बनत चालली आहे. ज्यामुळे लोकांना नाक, कान आणि घशाचे आजार होत आहेत. प्रदूषणामुळे लोक सायनसग्रस्त होत आहेत, ज्यामुळे अ‍ॅलर्जी, सर्दी-खोकला, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. कोरोना काळात तर हे आणखी धोकादायक ठरू शकते. बदलत्या हवामानात सायनसपासून बचाव करणे खुप गरजेचे आहे. हा बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेवूयात :

1 आले, लसूण आणि कांदा

याच्या सेवनाने पचन आणि श्वासाच्या समस्या दूर होतात. इम्यून सिस्टम मजबूत होते. आल्यामुळे नाक स्वच्छ होते. सायनोसायटिसशी संबंधित वेदनांमध्ये आराम मिळतो. कफ, सर्दी, खोकला आणि सायनसवर उपयोगी आहे.

2 मध आणि हळदीचे दूध प्या

एक ग्लास दूधात एक चिमूट हदळ आणि एक छोटा चमचा मध मिसळून सुमारे दोन आठवड्यांपर्यंत प्या. सायनसच्या आजारात आराम मिळतो.

3 काळीमिरीचे सूप प्या

काळीमिरीचे सूप सेवन करणे सायनसवर खुप परिणामकारक ठरते. एक कप कोणतेही सूप घ्या आणि त्यामध्ये एक छोटा चमचा काळीमिरी पावडर टाका. आठवड्यात तीन ते चार वेळा या सूपचे सेवन करा.

4 दालचीनी काढा बनवा

एक ग्लास गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये एच छोटा चमचा दालचिनी मिसळून उकळवा. हे चहाप्रमाणे प्या. हा काढा दिवसात एकदा प्या.

5 लिंबू आणि मध

एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळा आणि त्यामध्ये एक चमचा मध मिसळा. हे सुमारे दोन ते तीन आठवडे रोज सकाळी प्या.

6 वाफ सर्वात प्रभावी

या हवामानात वाफ जादूसारखी काम करते. वाफ बंद नाक मोकळे करण्यास मदत करते. यामुळे सर्दी, खोकल्यात आराम मिळतो आणि घशात जमा झालेला कफ बाहेर काढला जातो.