Health benefit of Nimboli | अतिशय चमत्कारी आहे ‘या’ झाडाचे फळ, औषधी गुणांचे भांडार, किडनीची घेते काळजी, 5 मोठे फायदे करतील हैराण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –Health benefit of Nimboli | आयुर्वेदात कडुलिंबाचे झाड आरोग्यासाठी खूप लाभदायक मानले जाते. प्राचीन काळापासून औषध म्हणून याचा वापर केला जातो. या झाडाचा प्रत्येक भाग खूप फायदेशीर आहे. यापैकी एक म्हणजे कडुलिंबाचे फळ ज्याला निंबोळी असे म्हणतात. निंबोळीचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया (Health benefit of Nimboli) –

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण

निंबोळी किंवा कडुलिंबाच्या बिया अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात. या फळांमध्ये आढळणारे गुणधर्म अनेक आजारांना शरीरापासून दूर ठेवतात. कडुलिंबाच्या फळामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी आणि कॅरोटीन सारखे घटक मुबलक असतात. यामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक घटक असतात, जे शरीराला अनेक फायदे देतात. (Health benefit of Nimboli)

निंबोळीचे ५ चमत्कारी आरोग्यदायी फायदे

किडनी आणि प्रोस्टेट रोगांवर लाभदायक :

कडुलिंबाच्या फळे आणि पानांपासून बनवलेला चहा आरोग्यासाठी चांगला मानला जातो. या चहामुळे किडनी संबंधित आजार दूर होतात. किडनीच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदात दीर्घकाळापासून याचा वापर केला जात आहे. त्याचा चहा बनवण्यासाठी २-३ फळे आणि कडुलिंबाची ३-४ पाने पाण्यात उकळवा. गाळणीच्या मदतीने गाळून घ्या आणि थंड झाल्यावर सेवन करा. हे नियमितपणे प्यायल्याने किडनी आणि प्रोस्टेटच्या समस्यांपासून सुटका होते. मात्र, त्याच्या कडू चवमुळे, सुरुवातीला ते पिणे कठीण वाटू शकते.

केसांना संसर्गापासून वाचवा :

केसांशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी निंबोळी गुणकारी मानली जाते. केस गळणे आणि कोंडा होण्याची समस्या असल्यास कडुलिंबाचा वापर लाभदायक ठरतो. यामध्ये अँटी-बायोटिक, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल असे गुणधर्म असतात, जे केसांना संसर्गापासून दूर ठेवतात.

यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी आणि कॅरोटीन सारखे घटक असतात, ज्यामुळे केसांच्या समस्यांपासून सुटका होते. यासाठी कडुलिंबाची फळे बारीक करून केसांना लावू शकता.

मलेरियाचा धोका टाळा :

कडुनिंबाचा आयुर्वेदात अनेक प्रकारे औषध म्हणून उपयोग केला जातो. याच्या बिया मलेरियावरील सर्वात प्रभावी उपाय आहेत. कडुलिंबाच्या बिया पावडर करून वापरल्याने मलेरियापासून बचाव होतो. यासोबतच निंबोळीपासून काढलेले तेल लावल्याने डास चावण्यास प्रतिबंध होतो. यामुळेच कडुलिंबाची फळे मलेरियाचा धोका कमी करू शकतात.

त्वचेच्या समस्या टाळा :

निंबोळीपासून काढलेले तेल अनेक वर्षांपासून त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते. हे तेल चेहरा किंवा प्रभावित भागावर लावल्याने त्वचा चमकदार होते. कडुनिंबाच्या बियांमध्ये अँटी-फंगल तसेच अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात, जे एक्जिमा, सोरायसिस आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या विविध आजारांवर उपचार आणि प्रतिबंध करतात.

दातांसाठी लाभदायक :

दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंब प्राचीन काळापासून ओळखला जातो.
कडुलिंबातील नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक घटक दात स्वच्छ ठेवतात.
तसेच हिरड्या सुजल्या असतील किंवा दात किडत असतील तर निंबोळी तेलाचा वापर करा. यामुळे दातांच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sakshi Chopra | बिग बॉस 17 मध्ये येणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा; आपल्या रिव्हिलिंग फॅशनसाठी जाते नावाजली

पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून झोन-2 मधील 3 सराईत गुन्हेगार तडीपार

बनावट कागदपत्रांच्या आधारे सारस्वत बँकेची 27 लाखांची फसवणूक, बिल्डरसह चार जणांविरुद्ध FIR, एकाला अटक

सुरक्षारक्षकांना मारहाण करुन किर्लोस्कर कंपनीच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी, 7 ते 8 जणांवर FIR

ACB Trap News | 95 हजारांची लाच घेताना शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक,
शिपाई अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरचा हॉट अंदाज; नेटेट टॉपने वेधले सर्वांचे लक्ष

विमानतळ परिसरात दहशत माजवणाऱ्या चिक्या गायकवाड व त्याच्या इतर 2 साथीदारांवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 52 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA