‘कोरोना’सह ‘या’ 5 आजारांपासून तुम्हाला दूर ठेवेल ओव्याचा काढा ! जाणून घ्या तयार करण्याची योग्य पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोनाच्या संक्रमणापासून दूर राहण्यासाठी अनेक लोक विविध उपाय करत आहेत. आयुष मंत्रालयानंही लोकांना काढा पिण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून लोकांना कोरोनासोबत लढण्यासाठी मदत मिळेल. आयुर्वेदातही काढ्याला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही काढा पिला तर कोरोनासह 5 आजारांपासून दूर रहाल. आज आपण यासाठी बनवल्या जाणाऱ्या खास काढ्याबद्दल माहिती घेणार आहोत.

खास ओव्याचा काढा

ओवा स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होतो. याचे शरीराला अनेक फायदे होतात. अन्न पचन होण्यासाठीही याचा खूप फायदा होतो. काढ्यामध्येही याचा वापर केला जाऊ शकतो. हा ओव्याचा काढा कसा तयार करावा, यासाठी कोणत्या वस्तूंची गरज पडते हेही आपण जाणून घेणार आहोत.

ओव्याच्या काढ्यासाठी सामग्री

– 1 चमचा ओवा
– हळद
– मध
– काळं मीठ
– लिंबू
– अॅप्पल व्हिनेगर
– अर्धा लिटर पाणी

असा तयार करा ओव्याचा काढा

– सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा
– पाणी गरम झाल्यानंतर यात हळद आणि ओवा घाला
– पाणी उकळून अर्ध झाल्यानतंर गॅस बंद करा
– आता हे पाणी गाळून घ्या
– यात लिंबू, काळं मीठ, मध घाला
– आता तुमचा ओव्याचा काढा सेवनासाठी तयार आहे.

ओव्याच्या काढ्याचे फायदे –

1) ओव्याचा काढा पिल्यानं शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर पडतात.

2) कफ निघून जाण्यासाठीही याचा खूप फायदा होतो

3) पोटाशी संबंधित काही विकार असतील यावर देखील ओव्याच्या सेवनाचा लाभ होतो.

4) जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ओव्याचा खूप फायदा मिळतो.

5) ओवा पाण्यात टाकून जर याचं सेवन केलं तर पचनशक्ती वाढते.

6) 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी या पाण्यात 1 चमचा मध घालून हे पाणी रिकाम्यापोटी प्यावं. याचा पोटाला खूप लाभ मिळतो.

7) जर खोकला येत असेल तर पाण्यात ओवा घालून हे पाणी उकळून घ्या. नंतर थोडे काळे मीठ टाकून याचं सेवन करा.

8) पित्ताचा त्रास होत असेल ओव्याचा खूप फायदा होतो. ओवा, सैंधव आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर घेतली तर लाभ मिळेल.

9) जर तुमचं पोट साफ होत नसेल तर दुपारी जेवल्यानंतर 1 ग्लास ताकात ओव्याची पूड आणि सैंधव टाकून प्या. यामुळं तुमचं पोट साफ होण्यास मदत मिळेल.

10) अतिसाराचा त्रास होत असेल तर यासाठीही ओव्याचा फायदा मिळेल. जर असा त्रास होत असेल तर दिवसातून 2 वेळा ओव्याच्या पाण्याचं सेवन करावं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.