Coronavirus : सर्दी-खोकला सुद्धा COVID-19 च्या विरूद्ध देऊ शकतो ‘इम्यून’ पॉवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात सर्दी-खोकल्याने पीडित होणे धोकायदायक आहे. परंतु, एक हैराण करणारा असा अभ्यास समोर आला आहे, जो हा दावा करतो की, सामान्य सर्दी-खोकला तुम्हाला कोविड-19च्या विरूद्ध काहीप्रमाणात इम्यूनिटी प्रदान करू शकतो. या इम्यूनिटीच्या पाठीमागे खरे कारण टी-सेल्स आहे. टी सेल्स ह्या प्रत्यक्षात व्हाईट ब्लड सेल्सच्या भाग असतात. त्या कोरोनाविरूद्धच्या लढाईत शरीराच्या प्रतिकारशक्तीला मदत सुद्धा करतात.

जर्मनीच्या ट्यूबिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी कोविड-19 संसर्गातून बर्‍या झालेल्या रूग्णांच्या आणि अन्य निरोगी लोकांच्या ब्लड सेल्सवर तुलनात्मक अभ्यास केला आहे. या रिसर्चच्या दरम्यान संशोधनकर्त्यांना आढळले की, 185 निरोगी लोकांवर केलेल्या अभ्यासाच्या दरम्यान सुमारे 81 टक्के लोकांमध्ये कोविड-19 च्या बाबतीत एक प्रकारची इम्यूनिटी दिसून आली. या लोकांमध्ये टी-सेल्स स्पिॉन्स जास्त दिसून आला. संशोधकांचे म्हणणे आहे की, यापैकी बहुतांश लोक नुकतेच सामान्य सर्दी-खोकल्याने ग्रस्त होते. सामान्य सर्दी-खोकलासुद्धा एकप्रकारच्या व्हायरसमुळेच होतो.

कोविड-19 ची सामान्य सर्दी-खोकल्याशी तुलना यापूर्वीही करण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा असे काही रिसर्च झाले आहेत. मागच्या महिन्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सुद्धा म्हटले होते की, कोविड-19च्या विरूद्धच्या लढाईत सामान्य सर्दी-खोकल्याने एकप्रकारची इम्यूनिटी मिळते. संशोधनकर्त्यांनी लिहिले आहे की, या प्रक्रियेत टी-सेल्सची भूमिका योग्य प्रकारे समजून घेतल्यास भविष्यात कोविड-19 ची वॅक्सीन किंवा औषध बनवण्यास मदत होऊ शकते. लंडनच्या जेनेटिक्स स्कूलचे डायरेक्टर प्रोफेसर फ्रँकोइस बलॉक्स यांनी म्हटले आहे की, प्री एक्जिस्टिंग टी-सेल्सची इम्यूनिटी शोधण्याची प्रक्रिया आश्चर्यकारक आहे.