Covid-19 Antibodies : अँटीबॉडीज विकसित झाल्यावर प्लाझ्मा डोनेट करू शकतो का ? घ्या जाणून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणू महामारीला सुमारे १० महिने होणार आहेत, परंतु अद्यापही या धोकादायक विषाणूचा जगभर कहर आहे. भारत कोरोना विषाणूच्या बाबतीत अमेरिकेनंतर दुसरा प्रभावित देश आहे. भारतात कोरोना संक्रमितांची संख्या ५६ लाखांवर गेली आहे.

एकीकडे देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, पण इथे लोक उपचारानंतर वेगाने बरेहा होत आहेत. भारतात आतापर्यंत सुमारे ४७ लाख लोक कोरोनामधून पूर्णपणे बरे झाले आहेत.

जेव्हापासून कोरोना विषाणू महामारी पसरण्यास सुरुवात झाली आहे, तेव्हापासून वैद्यकीय तज्ञ आणि शास्त्रज्ञ देखील त्याबद्दल अधिकाधिक माहिती गोळा करत आहेत. भारतातही कोरोना चाचणी वेगाने चालू आहे. तसेच परिस्थितीला चांगल्या प्रकारे समजण्यासाठी सिरो सर्वेक्षणही केले जात आहे.

दिल्लीतही सातत्याने सिरो सर्वेक्षण केले जात आहे. ताज्या अहवालानुसार, ३३ टक्के लोकांच्या शरीरात कोरोना व्हायरस अँटीबॉडीज सापडली आहे. शरीरात आढळलेल्या अँटीबॉडीजचा अर्थ असा की, या लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे आणि त्यांच्या शरीराने त्या विरूद्ध अँटीबॉडीज विकसित केल्या आहेत.

ज्यांच्यात अँटीबॉडी विकसित झाली आहे, ते प्लाझ्मा डोनेट दान करू शकतात का?
बहुतेक तज्ञांचे मत आहे की, अँटीबॉडीज विकसित झालेले लोक प्लाझ्मा दान करू शकतात की नाही हे ठरवणे कठीण आहे. वास्तविक यासाठी वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात. सामान्यत: असे मानले जाते की, केवळ मध्यम किंवा गंभीर कोरोना रूग्णच प्लाझ्मा दान करू शकतात.

प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची स्वतःची स्मृती असते, शिकवण असते कि कोणत्या विषाणूविरूद्ध कशा प्रकारे लढायचे आहे. तसेच प्रत्येक शरीराची प्रतिक्रिया पद्धत देखील भिन्न असते. म्हणून हे आवश्यक नाही की जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात पेशी कार्य करत असतील, तर त्या पेशी इतरांमध्येही चांगले कार्य करतील.

अँटीबॉडीची ओळख कशी होते?
अँटीबॉडी ओळखण्यासाठी सीरोलॉजिकल टेस्ट केली जाते. ही एक रक्त चाचणी असते, जिच्या मदतीने व्यक्तीच्या रक्तात उपस्थित अँटीबॉडी ओळखता येते. जर रक्तातील लाल रक्तपेशी काढून टाकल्या, तर जो पिवळा पदार्थ शिल्लक राहतो त्याला सीरम म्हणतात.

या सीरममध्ये उपस्थित अँटीबॉडीजमधून वेगवेगळे आजार ओळखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेरोलॉजिकल चाचण्या केल्या जातात. सेरोलॉजिकल चाचण्यांमध्ये एक गोष्ट सामान्य असते आणि ती म्हणजे ते सर्व रोगप्रतिकारक शक्तीने तयार केलेल्या प्रथिनांवर लक्ष केंद्रित करतात. शरीराची ही रोग प्रतिकारक क्षमता बाह्य घटकांद्वारे शरीरावर केल्या जाणाऱ्या हल्ल्याला थांबवून तुम्हाला आजारी पडण्यापासून वाचवते.