उन्हात ‘या’ पध्दतीनं डोळयांची काळजी नाही घेतली तर होवू शकते मोठी अडचण, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   उन्हाळ्याच्या हंगामात बरेच रोग वेगाने पसरतात. या वेळी, धूळयुक्त गरम हवा त्वचेसाठी अत्यंत हानिकारक असते तसेच डोळ्यांसाठीही हानिकारक असते. या कारणास्तव या उन्हाळ्यात डोळ्यांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. या हंगामात कोरडेपणा, खाज, जळजळ आणि डोळे लाल होणे ही सामान्य समस्या आहे. डोळे हे आपल्या शरीराचा एक अतिशय नाजूक आणि महत्वाचा भाग आहे. म्हणून, डोळ्यांविषयी सावधगिरी बाळगणे आपल्यासाठी गरजेचे आहे. जाणून घ्या,काही सोप्या उपायांचा अवलंब करून आपण उन्हाळ्यात डोळ्यांच्या समस्येपासून कसे मुक्त होऊ शकता.

– उन्हाळ्याच्या दिवसात, बाहेर जाण्यापूर्वी सूर्यप्रकाशात चष्मा घेणे विसरू नका जेणेकरून आपले डोळे धूळांच्या कणापासून वाचतील.

– उन्हाळ्यात दिवसातून 5 -6 वेळा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने आपणास ताजेपणा येईल, डोळ्यांत असलेले कोणतेही कण पाण्याने बाहेर प़डतील.

– उन्हाळ्यात डोळे कोरडे होऊ नये यासाठी आय ड्राॅप वापरा. परंतु हे करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा डोळ्यांनाही नुकसान होऊ शकते.

– उन्हाळ्याच्या हंगामात , कुणीतरी वापरलेल्या टॉवेल्स आणि रुमालाने तोंड पुसणे टाळा. असे केल्याने डोळ्यास संसर्ग होऊ शकतो.

– ड्राय आय सिंड्रोमपासून मुक्त होण्यासाठी, एसीचे जास्त कुलिंग, संगणकाचा जास्त वापर , रात्रीच्या वेळी दिवे विझविणे आणि मोबाइल पाहणे टाळावे.