‘डिप्रेशन’ म्हणजे नेमकं काय ?, जाणून घ्या ‘लक्षणं’ आणि ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाइन – डिप्रेशनमुळे आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आपण अनेकदा ऐकत असतो. नैराश्यातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल लोक उचलतात. काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. कोरोना महामारीच्या काळात नोकरी, आर्थिक प्रश्न, करिअर यामुळे अनेक लोक तणावाला तोंड देत आहेत. यामुळे कोरोनाएवढीच चिंता वाढली आहे. डिप्रेशनची लक्षणं आणि उपाय जाणून घेतले तर काळजी घेता येऊ शकते…

ही आहेत लक्षणं
1 लहान लहान गोष्टींवरून राग येणे.
2 दु:खी असल्याची जाणीवही होत नाही.
3 जवळच्या लोकांपासून दूर राहणे
4 एकाकी समजणे
5 जास्तवेळ झोपणं किंवा झोप न लागणे
6 भूक न लागणे
7 कोणाशीही बोलण्याची इच्छा न होणे
8 डोक्यात सतत वाईटसाईट विचार येणे
9 भीती वाटणे
10 कारण नसताना रडू येणे
11 अशक्तपणा जाणवणे
12 सतत डोकेदुखीची समस्या होणे
13 ह्रदयाची धडधड वाढणे
14 अंगाला घाम सुटणे.

करा हे उपाय
1 मित्र-मैत्रिणींशी बोला. मनातील गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करा.

2 आवडणारे संगीत ऐका. आवडीची गाणी ऐका.

3 एखादा छंद जोपासा. मन गुंतवून ठेवा.

4 कुटुंबाला वेळ द्या. ऑफिसचं काम घरी करू नका.

5 वेळ काढून फिरायला जा. महत्वाचं म्हणजे कोणतंही व्यसन करू नका.

6 नियमित व्यायाम किंवा ध्यान करा.