Blood Pressure Reading : ‘हायपरटेन्शन’ आणि ‘ब्लड प्रेशर’ला मॅनेज करण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   उच्च रक्तदाब (Hypertension) हा बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारा आजार आहे जो कोणालाही त्याच्या नियंत्रणाखाली आणू शकतो. उच्च रक्तदाब नियंत्रित न केल्यास हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या आरोग्याच्या समस्येचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे किंवा ज्यांचा रक्तदाब कमी किंवा अधिक होत असेल त्यांनी सातत्याने आपला रक्तदाब मोजणे आवश्यक असते.

जे लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत त्यांना हे माहित असावे की रक्तदाब (blood pressure) तपासणीसाठी योग्य वेळ कोणती आहे. आपण डॉक्टरांकडे जाऊन रक्तदाब तपासणी करून घेऊ शकता किंवा घरीच स्वत: तपासणी करू शकता, आपला शारीरिक क्रियाकलाप, खाण्याची वेळ, आपली दिनचर्या रक्तदाब तपासण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात.

रिडींगला कसे समजून घ्यावे

रक्तदाब मोजण्यापूर्वी आपल्याला सामान्य रक्तदाब काय आहे आणि उच्च रक्तदाब काय आहे हे माहित असले पाहिजे. रक्तदाब मोजण्यासाठी दोन संख्या असतात, सिस्टोलिक (शीर्ष) आणि डायस्टोलिक (तळाशी). पाराच्या मिलीमीटरमध्ये रक्तदाब मोजला जातो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, रक्तदाबाचे पाच प्रकार आहेत.

रक्तदाबाचे प्रकार:

सामान्य रक्तदाब

120/80 मिमी एचजी पेक्षा कमी रक्तदाबाला सामान्य मानले जाते.

एलिवेटिड

अशी स्थिती तेव्हा उद्भवते, जेव्हा रिडींग सातत्याने 120-129 सिस्टोलिक आणि 80 मिमी एचजी डायस्टोलिकच्या खाली असते. अशा प्रकारचे रिडींग ज्या लोकांमध्ये सातत्याने येते, त्यांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते.

हाय ब्लड प्रेशर स्टेज- 1

उच्च रक्तदाब स्टेज 1 तेव्हा उद्भवतो जेव्हा रक्तदाब निरंतर 130-139 सिस्टोलिक किंवा 80-89 मिमी एचजी डायस्टोलिक असतो.

हाय ब्लड प्रेशर स्टेज- 2

उच्च रक्तदाब स्टेज -2 तेव्हा उद्भवतो जेव्हा रक्तदाब निरंतर 140/90 मिमी एचजी किंवा त्याहून अधिक असतो.

शेवटची स्टेज

जर रक्तदाबाची रिडींग 180/120 मिमी एचजीपेक्षा जास्त असेल तर ही रिडींग आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. अशा वेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

डॉक्टरांना भेट द्या किंवा घरीच रक्तदाब तपासणी करा

वेगवेगळ्या वेळी रक्तदाब मोजून रक्तदाबाच्या स्थितीचे अधिक चांगले मूल्यांकन केले जाऊ शकते. रक्तदाबाची तपासणी करण्यासाठी डॉक्टर वेगवेगळ्या वेळी येऊन बीपी तपासणी करण्यासाठी सांगत असतात, म्हणून बहुतेक लोक वारंवार बीपी तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा घरी बसूनच बीपी तपासणी करणे अधिक सोयीचे मानतात.

रक्तदाबाची योग्य तपासणी कशी करावी

रक्तदाब तपासणी करण्यासाठी कोणतीही एक योग्य वेळ नाही, कारण तुमचा रक्तदाब वेळ आणि शरीराच्या क्रियेनुसार कमी अधिक होत राहतो. परिणामी महत्वाचे हे असते की रक्तदाब कशा पद्धतीने तपासला जावा.

दिवसातून दोनदा रक्तदाब तपासणी करा

आपला रक्तदाब सकाळी सर्वात कमी असतो आणि दिवसा 30 टक्क्यांपर्यंत त्याची पातळी बदलत राहते. हा बदल हार्मोनल चेंजेस, शारीरिक क्रियाकलाप आणि खाण्यामुळे होतो. म्हणून दिवसातून दोनदा रक्तदाब मोजणे आवश्यक आहे.

काही लक्षात घेण्यासारख्या गोष्टी:

– एक वेळापत्रक सेट करा: वेळापत्रक निश्चित करणे म्हणजे दररोज त्याच वेळी रक्तदाब चेक करा. एक नित्यक्रम सेट करा आणि त्याचे अनुसरण करा.

– एकाच वेळी अनेक रिडींग घ्या. एका रिडींगच्या आधारे निष्कर्षांवर येऊ नका. सरासरी दराचे मूल्यांकन करण्यासाठी एका वेळी 2-3 रिडींग केल्याने योग्य तो रक्तदाब शोधला जातो.

– रक्तदाब मोजण्यापूर्वी हे सुनिश्चित करा की आपण वॉक केल्यानंतर रक्तदाब मोजू नये. चालल्यानंतर रक्तदाबात चढ-उतार होत असतो.

– रिडींग करण्यापूर्वी कमीतकमी 30 मिनिटांपूर्वी व्यायाम, धूम्रपान, कॅफिनचे सेवन अथवा हेवी आहार घेऊ नका. या सर्व गोष्टींमुळे आपला रक्तदाब वाढू शकतो.

– रक्तदाब उभे राहून तपासू नये. उभे राहून तपासणी केल्याने रिडींगमध्ये बदल होऊ शकतो. रक्तदाब तपासताना हात हलवू नये तर तो सरळ ठेवावा.

– रक्तदाब मशीनची योग्यप्रकारे तपासणी करा. बर्‍याच डिजिटल मशीन्स वेगवेगळ्या रिडींग दर्शवितात. म्हणून, स्वत:साठी योग्य रक्तदाब रीडर मशीन खरेदी करा. हे लक्षात असुद्या की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मशीन खरेदी करा.