दातांचा पिवळटपणा आणि काळे डाग कसे साफ कराल, जाणून घ्या चमकदार दातांचे उपाय

0
1531
teeth
file photo

आपलय रोजच्या दैनंदिनीमध्ये आपण रोज सकाळी दात स्वच्छ करतो. अनेक जण रात्री झोपतानाही दात स्वच्छ करून मगच झोपतात. तरीसुद्धा अनेकांच्या दातांवर नेहमी काळे, पिवळे डाग दिसून येतात. साधारणपणे जे लोक पान, गुटखा, तंबाखू खातात किंवा चहा जास्त पितात त्यांच्या दातांवर काळे पिवळे डाग पडतात. वैद्यकीय परिभाषेत या पिवळ्या डागांना “प्लाक” म्हणतात काळे डाग यांना “टार्टर” म्हणतात. ओन्ली माय हेल्थ क्लिनिक डॉक्टर विकास यांनी दातांचा पिवळेपणाची कारणे आणि काळे डाग दूर करण्याचे उपाय सांगितले आहेत.

“प्लाक” म्हणजे काय?

प्लाक एक चिकट पदार्थ आहे ज्यामुळे दातांवर एक थर तयार होतो. प्लाकमुळे दात पिवळे दिसून येतात. तोंडात असलेल्या बॅक्टेरियलमुळे प्लाक वाढत जातो. तुम्ही घास चावून खाता तेव्हा अन्न लाळीसोबत मिक्स होते. त्यानंतर बॅक्टेरियाद्वारे पचनाचे काम केले जाते, त्यामुळे दातांच्या मध्ये अन्नकण अडकल्याने प्लाक तयार होतात. जी व्यक्ती रोज दोन ते तीन वेळा दात स्वच्छ करतात त्यांच्या दातांवर प्लाक जमा होत नाही. नियमितपणे व्यवस्थित दात घासत नाहीत त्यांचे दात प्लाकमुळे खराब होतात.

“टार्टर” म्हणजे काय?

जेव्हा दीर्घकाळ दातामध्ये जमा होतं तेव्हा त्याचा रंग जास्त पिवळा आणि काळा होत जातो त्याला “टार्टर” असं म्हणतात. ज्या व्यक्तींच्या दातांमध्ये पिवळे डाग दिसून येतात. तेव्हा दातांमध्ये प्लाक जमा झालेले असतात, त्यामुळे हिरड्यांना नुकसान होत सतत हिरड्यांवर परिणाम झाल्याने गंभीर आजारांचा धोका उद्भवतो. प्लाक आणि टार्टर यामुळे श्वासांना दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवते. कॅविटीज येणं, तोंडातून दुर्गंधी येणे, हिरड्या खराबह होण, पेरिओडोन्टल समस्या, जिंजीवाटीस म्हणजे हिरड्यांना सूज येणे अशा समस्या उद्भवतात. दात स्वच्छ करण्यासाठी ब्रश करणं हा पहिला उपचार आहे. त्यामुळे दातांमध्ये प्लाक आणि टार्टरची समस्या दूर होऊ शकते. खाल्ल्यानंतर जर योग्य पद्दतीने ब्रश केला तर दातांमध्ये प्लाक किंवा टार्टर जमा होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते. दात स्वच्छ करण्यासाठी व्यक्तीने कमीत कमी तीन ते तीन मिनिटे ते दोन वेळा ब्रश करावा.

स्केलिंग

स्केलिंग व्यक्तीचे दात निरोगी आणि मजबूत ठेवण्यास मदत करते. स्केलिंगमुळे पिवळेपणा आणि दातावरील डाग निघू शकतात. स्केलिंग थोडी महाग आहे परंतु जर दातांवर साचलेली घाण स्केलिंगद्वारे काढली गेली नाही तर दात खराब होऊ शकतात. ज्या लोकांच्या दात जास्त प्लाक आणि टार्टरमुळे काळे झाले आहेत त्यांनी डॉक्टरांकडे जावे आणि ते स्वच्छ करून घ्यावे.

घरगुती उपाय

दातांवरील प्लाक चा प्रभाव कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की दातांचा पिवळेपणा कमी प्रमाणात दूर करू शकतात. तीव्रतेच्या टार्टरच्या

समस्येच्या बाबतीत वैद्यकीय मदत घेणे हा योग्य उपाय आहे आणि कोरफड मिसळून त्यात लिंबाचे काही थेंब घाला. दातांवर घासा. दहा मिनिटात स्वच्छ धुवा. दूरचा उपाय केल्यास दातांची समस्या दूर होऊ शकते दोन चमचे व्हिनेगर आणि पाणी गोळा करा असे केल्याने दात निरोगी राहतात. अल्कोहल कोल्ड्रिंक्स पॅकेट बंद फूड, चहा आणि कॉफी यामुळे दात खराब होतात त्यासाठी अशा ऍसिडिक पदार्थांचे सेवन केल्यानंतर दात स्वच्छ करा.

दुर्गंधी घालवण्यासाठी बडीशेप, लवंग, तुळशी आणि पुदिन्याची पाने चावून का मिनिटात किंवा इतर सुवासिक पण शुगर-फ्री च्युगंम ने दुर्गंधी कमी होते. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर दात घासायला हवेत. सॉफ्ट ब्रशचा वापर दात घासण्यासाठी करावा. सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला जर तुमचे दात चांगले ठेवायचे असतील तर आठवड्यातून एकदा गरम पाण्यात पेरूची पाणी उकळून घ्या. नंतर हे पाणी थंड करून गुळण्या करा त्यामुळे तुमचे दात दीर्घकाळापर्यंत मजबूत राहतील.