‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – फुफ्फुस हा आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव असून त्याच्या आरोग्यावरच शरीराचे आरोग्य अवलंबून आहे. सध्याच्या कोरोना व्हायरसच्या महामारीत फुफ्फुसांना जास्त धोका असल्याचे शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितले आहे. शिवाय, फुफ्फुसांमध्ये विषारी घटक साठत गेले तर विविध आजार होण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी कोणता आहार घ्या, जेणेकरून फुफ्फुसं चांगली ठेवू शकता, ते जाणून घेवूयात…

1 डाळिंब आणि सफरचंद
डाळिंबाच्या सेवनाने रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी फुफ्फुसं चांगली राहतात. लंग्स कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून दूर राहता येते.

2 आलं आणि आयुर्वेदिक चहा
आलं, तुळस, जेष्ठमध, लवंग, वेलची हे पदार्थ टाकून तयार केलेला चहा प्यायल्याने फुफ्फुस निरोगी राहू शकतात.

3 लसूण आणि कांदा
लसूण आणि कांदा हे दोन पदार्थ नियमित सेवन केल्याने फुफ्फुसांना मजबूती येते. फुफ्फुसांमध्ये धुळीचे कण, किटाणू जमा होण्यापासून रोखता येते.

4 ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड
ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड्समुळे त्यामुळे फुप्फुसांचे आरोग्य चांगले राहते. दूध, पनीर, दही, आळशीच्या बीया या पदार्थाचे सेवन करावे.