जाणून घ्या दुधीच्या सालीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, फेकून देताना विचार कराल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बाजारामध्ये दुधीची भाजी कोणत्याही ऋतूमध्ये उपलब्ध होते. आजपर्यंत तुम्ही दुधीचा वापर फक्त हलवा तयार करण्यासाठी किंवा भाजी, कोशिंबीर करण्यासाठी केला असेल. पण दुधीच्या सालीचा वापर करुन तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता. फक्त चवीसाठी नाही तर चांगल्या आरोग्यासाठी देखील दुधीच्या भाजीचे सेवन करणे उपयुक्त ठरते. जाणून घेऊयात दुधीच्या सालीचे सेवन केल्याने होणारे आरोग्यदायक फायदे.

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी

दुधी शरीरासाठी थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा कोणत्याही ऋतूमध्ये शरीराच तापमान वाढल्यास याचा फायदा होतो. उष्णता वाढल्यास पायांच्या तळव्यांमध्ये जळजळ होण्याची समस्या उद्भवते. अशावेळी जर तुम्ही दूधीची सालं पायाच्या तळव्यांना घासली तर आराम मिळतो. तसेच त्वचेवर जळजळ होत असेल तर दुधीची सालं चोळल्यास आराम मिळतो.

टॅनिंग निगून जाते

उन्हात गेल्यानंतर त्वचेवर सनबर्न, टॅनिगची समस्या उद्भवते. जर तुम्ही दुधीच्या सालीची पेस्ट तयार करुन तोंडाला लावली तर या समस्येपासून आराम मिळतो. हा पॅक सुकल्यानंतर तोंड स्वच्छ धुवून टाका. घरच्या घरी हा उपाय केल्यास त्वचेवर ग्लो येईल. शिवाय काळपटपणा देखील निघून जाण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

सध्याची जीवनशैली आणि लॉकडाऊनमुळे अनेकांना वजन वाढण्याची समस्या उद्भवली आहे. रोज दुधीचा रस पिऊन तुम्ही वाढलेलं वजन कमी करु शकता. तसेच त्वचेवर ग्लोही येतो. तुम्ही जर दूधीची भाजी खात नसाल तर रस पिल्याने फायदा होतो.

मुळव्याधावर आराम

अनियमित जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे अनेकांना आरोग्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागते. जर तुम्हाला मुळव्याधाची समस्या असेल तर दुधीच्या साली सुकवून त्याची पावडर तयार करा. तयार केलेली ही पावडर पाण्यासोबत घ्या. हा उपाय केल्यास मुळव्याधाच्या त्रासापासून आराम मिळतो.

पोटाच्या समस्येवर दूधी फायदेशीर

दुधी भोपळ्यामध्ये पाण्यचं प्रमाण जास्त असतं. तसेच दुधी भोपळ्यामध्ये फायबरही मुबलक प्रमाणात असतं. यामुळे पोटाच्या समस्या असणाऱ्या व्यक्तीसाठी आणि बुद्धकोष्टाची समस्या असणाऱ्यांसाठी दुधी एक हेल्दी पदार्थ ठरतो. नाश्त्यामध्ये दुधीपासून तयार केलेले पोहे खाल्ल्यास फायदेशीर ठरतात.

खास टीप – ही माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी देत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरीक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.