पाठीच्या कण्याच्या त्रासाकडं दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात ‘हे’ भयंकर परिणाम ! वेळीच व्हा सावध

पोलिसनामा ऑनलाइन – चुकीच्या पद्धतीनं बसणं, दीर्घकाळ बसून काम, व्यायामाचा अभाव, अपघात अशा कारणांमुळं पाठीच्या कण्याला इजा होऊ शकते. जर पाठीच्या कण्याच्या त्रासाकडं दुर्लक्ष केलं तर त्याचे काय परिणाम होतात तसंच याची रचना कशी असते आणि आपण काय काळजी घ्यायला हवी याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

अशी असते रचना

नॅशनल इंस्टिट्युट ऑफ न्यूरॉलॉजिकल डिसॉर्डर्स अँड स्ट्रोकच्या साईटवर दिलेल्या माहितीनुसार, पाठीच्या कण्यात मानेच्या भागात 7 मणके असतात. हा मणक्याचा भाग आपल्या माथ्याला आधार देतो. या मणक्याताील हालचालींमुळं माणसाला खाली बघून जमिनीवर काय आहे हे पहाता येतं. बसल्यानंतर किंवा उभं राहिल्यानंतर एका खांद्याकडून दुसऱ्या खांद्याकडे आणि पलीकडे नजर वळवता येते. मानेच्या खालच्या भागातील कण्यात फारशी हालचाल होत नाही. या भागातील मणक्यांना फासळ्या लागून असतात. यांच्या खाली कमरेचा भाग येतो छातीच्या भागात 12 मणके असतात. तर कमरेत 5 मणके असतात. हे 5 मणके माणसाचे वजन पेलण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. पाठीच्या कण्याला दुखापत किंवा गंभीर समस्या झाल्या तर वैद्यकीय परिभाषेत याला (एससीआय) Spinal Cord Injuries असं म्हटलं जातं.

पाठीच्या मणक्याला इजा झाल्यानं ‘असा’ होता परिणाम

जर पाठीच्या मणक्याला दुखापत झाली तर पोटावर आणि आतड्यांवरही काही वेळासाठी परिणाम होतो. वैद्यकीय भाषेत या स्थितीला इलियस (Ileus) म्हणतात. आतड्यांचं काम व्यवस्थित सुरू नसल्यानं पोटात आम्ल तयार होतं. हे आम्लद्रव बाहेर पडलं नाही तर त्यामुळं अल्सर होण्यााची भीती असते. घशासह शरीराला सूज येऊ शकते. याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ लोआ हॉस्पिट्स अँड क्लिनीकच्या वेबासाईटवर माहिती देण्यात आली आहे.

जर मोठी सर्विकल इंजुरी असेल तर पचनक्रियेवरही परिणाम होतो. अनेकदा घास गिळायला त्रास होतो. त्यावेळी नाकातून नळीच्या साहाय्यानं पोटात अन्न टाकलं जातं. याशिवाय एससीआयमुळं मुत्राशय आणि मेंदूतील संदेश बदलू शकतो. जेव्हा मुत्राशय भरतं तेव्हा मुत्राशयातील मज्जातंतू मुत्राशयात संदेश पाठवतात आणि मुत्रमार्गाची (मुत्रविसर्जन) करण्याची आवश्यकता दर्शवतात. एखाद्या दुखापतीनंतर मेंदूला संदेश पाोहचू शकत नाही. यावर उपाय म्हणून मुत्राशयाचा ताण कमी करण्यासाठी कॅथेटरला बाहेर काढलं जातं आणि पुन्हा त्या ठिकाणी रिप्लेस केलं जातं अनेकदा सर्जरी करण्याची वेळ येऊ शकते.

त्वचा आपल्या शरीरासाठी संरक्षणात्मक आवरण आहे. रक्तदाब आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं जास्त दबाव, उष्णता त्वचेत बिघाड होण्याची शक्यता असते. परिणामी स्किन अल्सर होतो. एससीआयनंतर शरीर त्वचेला होणाऱ्या धोक्याबद्दल माहिती देऊ शकत नाही. त्यामुळं शौचाला गेल्यांतर स्वच्छता करणं गरजेचं आहे.

एससीआयमुळं शरीराला तीव्र किंवा अती तीव्र वेदना होऊ शकतात. मानेच्या हाडांना दुखापत झाल्यास मेंदूवरही परिणाम होण्याची शक्यता असते. एकाग्रता, संवाद साधणं, स्मरणशक्ती या कार्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन व्यक्तीमत्वात नकारात्मक बदल होऊ शकतो. इतकंच नाही तर यामुळं लैंगिक जीवनावरही परिणाम होतो.

ही घ्या काळजी

जर तुम्हाला देखील अशा काही समस्या जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. लैंगिक समुपदेशन कार्यक्रमात सहभाग घ्या. जर तुमची बसण्याची किंवा उठण्याची पद्धत चुकीची असेल तर आजच त्यात बदल करा. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्लाही घ्या. शक्य असेल तितका वेळ रोज व्यायाम करा. स्ट्रेचिंग केल्यानं स्नायू चांगले राहतात. जास्तीत जास्त पाणी प्या. प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. ताण तणावमुक्त जगण्याचा प्रयत्न करा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

You might also like