घसा खवखवतोय का ?, ‘कोरोना’ची भीती न ठेवता करा ’हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन, दि. 15 सप्टेंबर : सध्या कोरोनाचा फैलाव अधिक होत आहे. त्यामुळे कोरोबाधित व्यक्तीच्या संपर्कात कोण गेलं तर त्यालाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक प्रमाणात वर्तविली जाते. त्यामुळे कोरोनाची लागण झाली असेल तर घसा खवखवणे, चव जाणे, धाप लागणे आदी प्राथमिक लक्षणे आढळू लागतात. मात्र, जर नुसता घसा खवखवत असेल तर कोरोनाची भीती न बाळगता काही घरगुती उपाय करायला काही हरकरत नाही. मात्र, यासाठी आपल्या वैद्यकीय सल्ला देखील घेणे तितकेच फायदेशीर ठरेल, हेही लक्षात ठेवावे.

थंड पदार्थ किंवा अन्य काहीही तेलकट खाल्यास घसा खवखवण्याची समस्या उद्भवते. तसेच अनेक कारणांमुळे घसा खवखवणं, सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवते. सर्दी, खोकला, घसा खवखवणं ही लक्षणं टॉन्सिल्सची देखील असू शकतात. घश्यातील वेदनेसह, घास गिळायला त्रास होणं, तोंडाचा खालचा भाग दुखणं, श्वासांमधून दुर्गंधी येणं ही लक्षणं आहेत का? जर हि लक्षणं असतील तर टॉन्सिल्सची समस्या असू शकते. तर, जाणून घेऊया घरगुती उपाय.

आलं
दररोज आल्याचा चहा प्यायल्याने घश्याच्या समस्या दूर होते. आलं एक नैसर्गिक वेदनशामक आहे म्हणून घशात वेदना आणि जळजळ शांत करण्यासाठी याचा उपयोग करतात. सर्दी, खोकला कमी करण्यासही आलं मदत करतं.

मध
मध शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले पोषक तत्व बॅक्टेरियांना नष्ट करतात. घश्यात होणारी खवखव दूर करण्यासाठी मध आणि दालचिनीचा वापर करतात. त्यासाठी दालचिनी पावडर आणि मध मिसळून 3 वेळा सेवन करावे. त्यामुळे टॉन्सिल्सची समस्या कमी होण्यास मदत होते.

हळद
हळदीचे फायदे अनेक आहेत. एंटी- बॅक्टेरिअल, एंटी-फंगल गुण हळदीत असतात. घसा खवखवण्याच्या समस्येवर उपाय म्हणून तुम्ही घरात हळदीचा वापर करू शकता. त्यासाठी हळद, काळं मीठ, काळी मिरी पाण्यात घालून उकळावे. या पाण्याने सलग दोन- तीन दिवस गुळण्या कराव्यात. हा उपाय केल्यास तुमची समस्या लवकर दूर होऊ शकते.

गरम पाणी
घश्यात समस्या उद्भवण्याअगोदर पासून तुम्ही दिवसातून दोनवेळा गरम पाणी पिण्याची सवय ठेवाल तर निरोगी राहाल. अनेकदा घसा सुका पडल्याने गळ्यात इन्फेक्शन होऊ कशतं. त्यामुळे एखाद्या मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन टॉवेलने आपला चेहरा झाकून त्या पाण्याची वाफ घ्यावी, असे केल्यानं घशाला झालेलं इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. हा उपाय दिवसातून दोनवेळा करावा, यातून आपणास आराम मिळू शकेल.

(टीप : आपल्या ज्ञानात अधिक भर पडावी म्हणून हि माहिती केवळ आपल्याला माहित असावी म्हणून दिली जात आहे, हे आपल्या लक्षात असू द्या. याबाबत आपण वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील निर्णय आणि समज करून घ्यावेत. तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी आपल्या वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधावा.)