हाय ब्लड प्रेशरला नियंत्रित करण्यासाठी दररोज करा ‘ही’ योगासनं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   प्राचीन काळापासून विविध आजार दूर ठेवण्यासाठी योगासनांचा आधार घेतला जात आहे. आधुनिक काळातसुद्धा डॉक्टर्स आजारांमध्ये योगासने करण्याचा सल्ला देतात. जर तुम्हीसुद्धा हायपरटेंशनचे रुग्ण असाल आणि हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करायचे असेल, तर काही योगासने जरूर करा. यामुळे हायपरटेंशनमध्ये खूप आराम मिळू शकतो. ही योगासने कोणती ते जाणून घेऊयात…

1 सर्वांगासन करा

यास लेग-अप द वॉल पोझसुद्धा म्हटले जाते. यासाठी भिंतीच्या आधाराने आपले पाय वर करावे लागतात. ही मुद्रा काही काळ सतत करायची आहे. सर्वांगासनात लक्ष श्वासावर केंद्रित केले पाहिजे. या योगाने सुरकुत्यासुद्धा गायब होतात.

2 सुखासन करा

हे ध्यान आसन आहे, ज्यामध्ये ध्यानाच्या मुद्रेत बसून आपले मन आणि मेंदू एखाद्या बिंदूवर केंद्रित करावे लागते. या योगामुळे मानसिक तणाव दूर होतो आणि रक्तप्रवाह योग्यप्रकारे होतो. यासाठी तुम्ही ध्यान मुद्रेत बसा आणि नंतर दीर्घ श्वास घ्या आणि नंतर श्वास रोखून ठेवा. योग्य माहिती घेऊन आपल्या क्षमतेनुसार हा योग करा.

3 पश्चिमोत्तानासन करा

समतोल जमिनीवर बसून आपल्या शरीराचा मागील भाग पुढे करणे, यास पश्चिमोत्तानासन म्हणतात. प्रथम दंडासन मुद्रेत बसा. यानंतर आपल्या शरीराच्या मागच्या भागाला पुढच्या बाजूला ओढा आणि पायांवर राहण्याचा प्रयत्न करा.

4 विपरीत करनी आसन

हे केल्याने मेटाबॉलिक हालचाली वेगाने होतात आणि ग्रंथी आणि हार्मोन्स संतुलित होतात. सोबतच यामुळे स्ट्रेस हार्मोन घटते आणि मन शांत होते. तणावामुळे हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करता येत नाही. यासाठी जमिनीवर भिंतीच्या आधाराने पाठीवर झोपा. आता दोन्ही पाय भिंतीवर ठेवा. या दरम्यान शरीर 90 डिग्रीच्या मुद्रेत असावे. हात बाजूला ठेवून सुमारे 15 मिनिटे दीर्घ श्वास घ्या.