वजन वाढवताना ‘या’ 3 गोष्टींचं सेवन अजिबात करू नका, जाणून घ्या काय होते नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे काही लोक वजन कमी करण्यासाठी अनेक तास वर्कआउट करून घाम गाळतात. तर दुसरीकडे काही लोक वजन वाढवण्यासाठी वर्कआउट करतात. परंतु, यामध्ये सर्व लोक यशस्वी होत नाहीत. यासाठी आहार, वर्कआउट आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.

जर यामध्ये चूक झाली तर वजन वाढवण्यात यश येत नाही. यासासाठी आपल्या डाएटमध्ये त्याच वस्तूंचा समावेश केला पाहिजे, ज्यातून आरोग्यासाठी लाभ होऊ शकतो. लोक वजन वाढवण्याच्या इच्छेपोटी अशा वस्तूंचे सेवन करतात, ज्यामुळे तब्येतीवर वाईट परिणाम होतो. वजन वाढवण्यासाठी कोणत्या वस्तूंचे सेवन टाळले पाहिजे ते जाणून घेवूयात.

1 फास्ट फूडचे सेवन करू नका
काही लोक वजन वाढवण्यासाठी फास्ट फूड भरपूर खातात. याबाबत त्यांचे म्हणणे असते की, फास्ट फूडचे सेवन केल्याने वजन लवकर वाढते. यात काहीही दूमत नाही की, फास्ट फूड वजन वाढण्यात सहायक आहे, परंतु फास्ट फूडच्या सेवनाने अनेक प्रकारचे आजार सुद्धा शरीरात जन्म घेतात. यासाठी नैसर्गिक पद्धतीेने वजन वाढवले पाहिजे. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये केवळ नैसर्गिक खाद्य पदार्थांचा समावेश करा.

2 मिठाई जास्त खाऊ नका
नेहमी दिसून येते की, लोक वजन वाढवण्यासाठी मिठाईचे अधिक सेवन करू लागतात. यामुळे दातांची समस्या वाढू लागते. सोबतच साखर कमी करण्यासाठी वर्कआउट न केल्याने मधुमेहाची समस्या होऊ शकते. यासाठी केवळ चवीसाठी गोड खा.

3 पॅकेट बंद मांस वापर करा
चिकन आणि मटण प्रोटीनचे मुख्यस्त्रोत आहेत. मात्र, पॅक्ड आणि फ्रिजमध्ये ठेवलेले मांस सेवन करू नये. यामुळे कँसर, हृदयरोग आणि अन्य आजारांचा धोका वाढतो. यासाठी ताजे चिकन आणि मटणासह सी फूड्स, मासे आणि अंडे यांचे सेवन करा.