स्मोकिंग करणार्‍या तरूण महिलांना हृदयरोगाचा जास्त धोका, जाणून घ्या : रिसर्च

पोलीसनामा ऑनलाईन टीम : स्मोकिंगमुळे प्रत्येक वयातील लोकांना हार्ट अटॅकची शक्यता वाढते. परंतु एका नव्या शोधानुसार, तरूण महिलांना हा धोका जास्त असतो. याबाबत ब्रिटिश संशोधकांनी जानेवारी 2009 आणि जुलै 2014 च्या दरम्यान इंग्लंडच्या यॉर्कशायर क्षेत्रात होणार्‍या तीव्र एसटी सेगमेंट एलिव्हेशन म्योकार्डिअल इन्फ्रक्शन (एसटीईएमआय) च्या 3,300पेक्षा जास्त प्रकरणांच्या आकड्यांचा तपास केला. एसटीईएमआयला एक मोठा हृदयाचा विकाराचा धक्का समजले जाते. हा आर्टरीज (धमण्या) पूर्णपणे ब्लॉक झाल्याने होतो.

मागील शोधात स्मोकिंगला सुमारे 50% एसटीईएमआय प्रकरणांशी जोडले गेले आहे. या शोधातून समजले की, 47.6% पुरुषांमध्ये आणि 46.8% महिलांना स्मोकिंगचे व्यसन होते. संशोधनात समजले की, स्मोकिंग करणार्‍या लोकांमध्ये एसटीईएमआयचा धोका वाढतो. याचा वय आणि लिंग याच्याशी काहीही संबंध नाही. परंतु हे सुद्धा समजले की, पुरुषांच्या तुलनेत महिलांना याचा धोका जास्त होता.

पुरूष आणि महिलांमध्ये धूम्रपान करणार्‍यांमध्ये सर्वात मोठी रिस्क रिस्क 50 ते 64 वर्षाच्या वयाच्या लोकांना असते, परंतु, दोन्ही लिंगापैकी सर्वात जास्त जोखीम 18 ते 49 वषाच्या वयात होती. या वयाच्या धूम्रपान करणार्‍या महिलांमध्ये, ज्या महिला स्मोक करत नव्हत्या त्यांच्या तुलनेत 13 टक्के एसटीईएमआयचा धोका जास्त होता. तर या वयाच्या पुरूषांमध्ये 8.6 टक्के धोका जास्त होता. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी जर्नलमध्ये 24 जूना हे संशोधन प्रकाशित झाले होते.