‘हेमा मालिनी-धर्मेंद्र’ यांच्या घरी आनंदाचा डबलडोज ! जुळ्या मुलांची आई झाली मुलगी अहाना

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  हेमा मालिनी (Hema Malini) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या घरी पुन्हा एकदा आनंदचा क्षण आला आहे. हेमा यांची मुलगी अहाना देओल (Ahana Deol) आई झाली आहे. खास बात अशीय की, अहानानं जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. खुद्द अहानानं ही खूश खबर सोशलवर शेअर केली आहे. तिनं एक ग्रिटिंगही शेअर केलं आहे.

अहानानं तिच्या इंस्टा स्टोरीला एक ग्रिटिंग कार्ड शेअर केलं आहे. यात तिनं लिहिलं की, कधी कधी चमत्कार जोडीनं होतो. सांगताना आनंद होत आहे की, घरात (Astraia & Adea Vohra) नावाच्या दोन मुलींचं घरात आगमन झालं आहे. त्यांचा जन्म 26 नोव्हेंबर रोजी झाला आहे. पॅरेंट्स वैभव वोहरा (Vaibhav Vohra) आणि अहाना यांना प्राउड वाटत आहे. भाऊ डॅरियन वोहरा उत्सुक आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ओव्हरजॉईड आहे असंही तिनं या पोस्टमधून सांगितलं आहे.

अशी माहिती समजत आहे की, अहाना सध्या हॉस्पिटलमध्येच आहे. तिला अद्याप डिस्चार्ज मिळालेला नाही.

अहानाच्या आणि वैभव यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं, तर 2014 मध्ये दोघं विवाहबद्ध झाले होते. आधीही त्यांना एक मुलगा झाला होता, ज्याचं नाव डॅरियन (Darien Vohra) आहे.

अहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर सुरुवातीच्या काळात तिनं सिनेमात नशीब आजमावलं आहे; परंतु नंतर तिनं वेगळं मत निवडत सिनेमांपासून अंतर राखलं.

 

You might also like