इंद्रायणी मुखर्जीमुळे पी. चिदंबरम यांना अटक ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा आयएनएक्स मीडिया’शी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणी जामीन फेटाळल्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची भीती आहे. मात्र अटकेच्या भीतीने ते बेपत्ता झाले असून त्यांचा फोन देखील बंद लागत आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे पथक त्यांचा शोध घेत असून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता त्यांना सुप्रीम कोर्टानेही दिलासा दिला नसून त्यांच्यावरील अटकेची तलवार कायम आहे.

मात्र या सगळ्यात आयएनक्स मीडियाचे प्रमोटर इंद्रायणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी दिलेल्या साक्षीमुळे पी. चिदंबरम यांना अटक होणार असल्याची चर्चा आहे. पी. चिदंबरम यांच्याबरोबरच इंद्रायणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांची देखील ईडीने चौकशी केली होती. त्यामुळे त्यांनी दिलेल्या माहितीनुसारच त्यांना अटक होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी हिने दिलेल्या माहितीनुसार आयएनएक्स मीडियाच्या प्रकल्पाला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची मंजुरी मिळत नव्हती. यामुळे त्यांनी पी. चिदंबरम यांची भेट घेतली होती. त्यावेळी चिदंबरम यांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी या प्रकरणात चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याने 10 लाख रुपयांची लाच मागितल्याचे देखील त्यांनी चौकशीत माहिती दिली होती.

दरम्यान, काल हायकोर्टाने चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचा जमीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like