माओवाद्यांसंदर्भात पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत हायकोर्टाची नाराजी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 


बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन  पुणे पोलिसांनी देशभर धाड टाकून पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी बंदी असलेल्या भाकपा (माओवादी ) संघटनांच्या थेट संबंधांचे पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले होते. यावर हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी घेतली ही पत्रकार परिषद घेतली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना माहिती जाहीर करने  चुकीचे आहे, असे हायकोर्टाने  म्हंटले आहे.

गंगा जगातील सर्वात प्रदूषित नदी : वर्ल्ड वाईड फंड

तपास अधिकारी जाहीरपणे प्रसार माध्यमात जाऊन माहिती कशी काय जाहीर करतात, असा हायकोर्टाने  सवाल केला आहे . भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होती. सर्व संबंधितांना याचिकेची प्रत देण्याचे निर्देश कोर्टाने  केले आहेत.

[amazon_link asins=’B07CC1X3DY,B07D77V1DX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’787a1e83-af55-11e8-bcdb-432831c895e6′]

काय घडले पत्रकार परिषदेत 

अतिरिक्त पोलीस महासंचालक,कायदा आणि सुव्यवस्था पीबी सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन माओवादी समर्थक आणि माओवाद्यांची सर्वोच्च समिती असलेल्या सेंट्रल कमेटी सदस्यांमधला थेट पत्रव्यवहारच पत्रकार परिषदेत सादर केला. या पत्रांमध्ये अत्यंत खळबळजनक माहिती असून देशाविरूद्ध युद्ध पुकारणं, शस्त्रास्त्रांची खरेदी करणं, मोदी राज संपवण्यासाठी त्या शस्त्रांचा वापर करणंन, राजीव गांधींची हत्या झाली त्यासारख्या घटनेची पुनरावृत्ती करणं असा माओवाद्यांचा डाव होता असे अत्यंत खळबळजनक पुरावेच पोलिसांनी सादर केले. असा आक्षेपार्ह मजकूर असलेली हजारो पत्र पोलिसांच्या हाती लागली असून त्यातली मोजकीच पत्र आम्ही जाहीर करत आहोत अशी माहितीही सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
जाहिरात

दोन महिन्यांच्या सखोल चौकशीनंतर पोलिसांनी हे पुरावे जमा केले त्यासाठी देशभरातल्या ९ ठिकाणांवर छापे टाकले आणि हे साहित्य जमा केले आणि त्यानंतरच पाच जणांची अटक केली अशी माहितीही सिंग यांनी दिली होती . विद्रोही कवी वरावर  राव, सुधा भारव्दाज, रोना विल्सन, अरूण परेरा आणि गौतम नवलखा यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्या सर्वांना त्यांच्याच घरांमध्य नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्या सर्वांविरूद्ध भक्कम पुरावे असल्यामुळे  त्या सर्वांचा पोलीस कोठडी मागणार असल्याचंही सिंग या नि या पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले होते. दरम्यान या पत्रकार परिषदेवरून हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.
जाहिरात