Coronavirus : देशात 24 तासात सर्वाधिक 5242 नवे रुग्ण तर 154 जणांचा बळी, ‘कोरोना’बधितांचा आकडा 95000 ‘पार’, आतापर्यंत 3029 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – आजपासून लॉकडाऊन 4 ची सुरुवात झाली असून गेल्या 24 तासात आतापर्यंतची सर्वाधिक उच्चांकी 5 हजार 242 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या 95 हजार 698 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात देशात 154 कोरोना बाधितांचा मृत्यु झाला असून देशातील कोरोना बाधितांची संख्या आता 3 हजारांहून अधिक झाली आहे. देशात एकूण 3 हजार 29 कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
देशात आता एकूण 95 हजार 698 कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली असून त्यापैकी 55 हजार 878 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर देशभरात विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

रविवारी दिवसभरात देशात प्रथमच ५ हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यात प्रामुख्याने कोरोना बाधित शहरातून अन्य ठिकाणी गेलेले व त्यांची तेथे झालेल्या तपासणीत हे प्रवासी कोरोना बाधित आढळून आलेल्यांचा अधिक समावेश आहे. 16 मे रोजी देशात 4 हजार 864 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते.

एका बाजूला उच्चांकी नवीन रुग्ण आढळून येत असतानाच कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांची संख्या मात्र रविवारी कमी आढळून आली. रविवारी दिवसभरात 2 हजार 571 जण बरे होऊन घरी गेले. 16 मे रोजी तब्बल 3 हजार 966 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. आतापर्यंत देशभरातील 36 हजार 795 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.