अभिनेत्री हिना खानमध्ये 11 वर्षात झाला ‘भलताच’ बदल, ‘या’ बाबतीत बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसलाही टाकलं मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री हिना खान सर्वात प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील हिनानं साकारलेली अक्षराची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. हिना खान घराघरात पोहोचली होती. एक साधी सिंपल सून म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणारी हिना आता खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस अ‍ॅक्ट्रेसमध्ये बदलली आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका सोडल्यानंतर हिना खतरों के खिलाडी 8 मध्ये दिसली होती. या शो मध्ये आल्यानंतर तिचा लुक एका साध्या सूनेपासून खूपच वेगळा होता.

यानंतर सर्वांनीच हिना खानला बदलताना पाहिलं आहे. तिनं कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारली होती. या शोमध्ये तिचा नवीन परंतु खूप ड्रॅमॅटीक अंदाज दिसला होता.

यानंतर हिना बिग बॉस 11 मध्ये दिसली. यामध्ये तिला पाहून सर्वजण हैराण झाले. कारण यावेळीदेखील हिनामध्ये झालेला बदल सर्वांना दिसत होता. तिच्या लुकसोबतच तिच्या हरकतींचीही चर्चा होताना दिसली.

आता तर अशी वेळ आहे की, हिना कान फॅशन चॉईस स्टेटमेंट बनली आहे. ती जे काही घालते ट्रेंड बनताना दिसतं. तिच्या लुकचे सर्वच फॅन आहेत. तुम्ही मागच्या काळातील हिना खानला ओळखू शकणार नाही.

टीव्हीनंतर आता हिना बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी तयार आहे. 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणाऱ्या हॅक्ड या सिनेमातून हिना खान बॉलिवूड डेब्यू करणार आहे. हा सिनेमा विक्रम भटनं डायरेक्ट केला आहे.