‘स्मिथला पाचव्या स्टम्पवर मारा करा’, सचिनचा गोलंदाजांना सल्ला

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) अपारंपरिक शैलीमुळे भारतीय गोलंदाजांना यष्टीच्या थोडा बाहेर मारा करावा लागेल, असे महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Great Batsman Sachin Tendulkar) म्हटले आहे.
आस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय वेगवान गोलंदाजांना सल्ला देताना सचिन म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान या फलंदाजाला पाचव्या स्टम्पच्या लाइनवर गोलंदाजी करावी लागणार आहे. चेंडू छेडखानी (Ball tampering) प्रकरणामुळे भारत-आॉस्ट्रेलिया 2018-19 च्या गेल्या मालिकेत बाहेर राहिलेला स्मिथ यावेळी भरपाई करण्यास सज्ज आहे. स्मिथने भारताविरुद्ध सहा कसोटी शतके झळकावली आहेत.

पुढे तेंडुलकर म्हणाला, स्मिथचे तंत्र अपारंपरिक आहे. साधारणपणे कसोटी सामन्यात आपण गोलंदाजाला उजवी यष्टी किंवा चौथ्या स्टम्पच्या लाइनने गोलंदाजी करण्यास सांगतो. पण येथे स्मिथ मूव्ह करतो. त्यामुळे कदाचित चेंडू लाइनपेक्षा चार ते पाच इंच आणखी पुढे असणे गरजेचे आहे. स्टीव्हच्या बॅटची कड घेण्यासाठी चौथ्या किंव्या पाचव्या स्टम्पच्या लाइनमध्ये गोलंदाजी करण्याचे लक्ष्य ठेवावे. जास्त काही नाही तर लाईन व मानसिकता बदलायची आहे. तसेच ‘स्मिथ आखूड टप्प्याच्या माऱ्यासाठी सज्ज आहे, असे मी वाचले आहे. पण गोलंदाज सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारतील, अशी आशा असल्याचे तो म्हणाला.

आयपीएल स्पर्धेच्या समाप्तीनंतर टीम इंडिया आस्ट्रेलिया दौ-यावर जाणार आहे. या दौ-यात टीम इंडिया आस्ट्रेलियाविरुद्ध टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. आस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

तेंडुलकर यांच्या गोलंदाजांना काही खास टिप्स :

-आक्रमक गोलंदाजासह धावा रोखणाऱ्या गोलंदाजाची ओळख करायला हवी. दिवस-रात्र कसोटीत हा गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
– दिवसाच्या पहिल्या सत्रात वेगाने धावा काढाव्या लागतील.
-सायंकाळ झाल्यानंतर गुलाबी चेंडू अधिक सीम होतो.
-खेळपट्टी थंड असेल त्यावेळी बळी घेणे सोपे असते.
– मयांकचे खेळणे निश्चित भासत आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांमध्ये स्मिथ, वॉर्नर व लाबुशेन महत्त्वाचे असतील.
-बॉर्डर-गावसकर ट्रॉफी राखण्याची भारताला चांगली संधी.
– विराटच्या अनुपस्थितीत अन्य खेळाडूंना छाप सोडण्याची संधी.
– भारताची बेंच स्ट्रेंथ दमदार. कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणेची उपस्थिती महत्त्वाची ठरेल.