हितेंद्र ठाकूर यांच्या ‘बहुजन विकास आघाडी’ समोर ‘शिट्टी’ मुळे पेच

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – बहुजन विकास आघाडी गेली अनेक वर्षे मुंबईतील वसई विरार भागात सत्ता गाजवत आहे. शिट्टी हेच चिन्ह घेऊन बहुजन विकास आघाडी सत्तेत आली मात्र शिट्टी हे चिन्ह बहुजन महापार्टी यांचे आधिकृत चिन्ह असल्याचे गॅझेट प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे आता ऐन निवडणूक तोंडावर असताना हितेंद्र ठाकूर यांचा ‘बविआ’ हा पक्ष कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आपला उमेदवार निवडणुकीच्या उतरवणार आहे. पण आपला उमेदवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? याबाबत पक्षामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बहुजन महापार्टी या पक्षाची नोंदणी जानेवारी २०१७ ची असून त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. या पक्षाने देशात तब्बल १०० उमेदवार उभे केले असून राज्यात ३० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. येत्या ६ एप्रिलला आणखी काही उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती जनरल सेक्रेटरी शमशुद्दीन खान यांनी दिली आहे. त्यामुळे आता ‘बहुजन विकास आघाडी’ निवडणूक चिन्हाचा प्रश्न कसा सोडवणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

दरम्यान बहुजन महापार्टी या पक्षाची जानेवारी २०१७ रोजी नोंदणी झाली असून यंदाची निवडणूक ही या पक्षाची पहिलीच निवडणूक आहे. या पक्षाकडून तब्बल १०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी ३० उमेदवार राज्यात निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच येत्या सहा तारखेला आणखी काही उमेदवार उभे करणार असल्याची माहिती जनरल सेक्रेटरी शमशुद्दीन खान यांनी दिली. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.