home page top 1

”स्टुडंट ऑफ द इअर-2”मधून विल स्मिथ करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा नवीन चित्रपट स्टुडंट ऑफ द इअर-2 लवकरच प्रदर्शित होत आहे. चित्रपटातून अभिनेता टायगर श्रॉफसोबत अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे तसेच तारा सुतारिया दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाती उत्सुकता लागली आहे. तसंच या चित्रपटाचे दुसरे आकर्षण ठरत आहे, ते हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ.

विल स्मिथ स्टुडंट ऑफ द इअर-2 मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याचे म्हटले जात आहे. एका व्हायरल झालेल्या व्हीडिओवरून ही शक्यता वर्तवली जात आहे. या व्हीडिओत विल स्मिथ स्टुडंट ऑफ द इअर चित्रपटातील कलाकारांसोबत थिरकताना दिसत आहे. यामुळे विल स्मिथही यामध्ये काम करणार असल्याची चर्चेला उधाण आले आहे.

चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगवेळी दिग्दर्शक करण जोहरला विल स्मिथबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर विल स्मिथ फेसबुकवरील एक शो ‘बकेट लिस्ट’च्या शूटिंगसाठी भारतात आला होता. स्मिथला बॉलिवूडच्या एका गाण्यावर डान्स करण्याची इच्छा आहे. चित्रपटात विल स्मिथ काम करणार आहे किंवा नाही यांवर मी काही सांगणार नाही. तुम्हाला हे माहित करुन घेण्यासाठी चित्रपट पहावा लागेल, असं करण जोहरने सांगितलं.

दरम्यान, या चित्रपटात दोन नवे चेहरे बॉलिवूडला मिळणार आहेत. अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांचे पूर्वीच अनेक चाहते आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकचा लागली आहे. १० मे ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Loading...
You might also like