27 व्या मजल्यावरून उडी घेऊन निर्मात्याची आत्महत्या, हॉलिवूडमध्ये प्रचंड ‘खळबळ’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मनोरंजन क्षेत्रातून येणाऱ्या निधनाच्या बातम्या काही केल्या थांबताना दिसत नाहीयेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच आता हॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हॉलिवूडचे निर्माते स्टीव्ह बिंग यांनी आत्महत्या केली आहे. स्टीव्ह यांनी 27 व्या मजल्यावरून उडी घेऊन आपली जीवन यात्री संपवली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळं आयसोलेशनमध्ये असलेल्या स्टीव्ह यांनी नैराश्येमुळंच एवढं टोकाचं पाऊल उटचललं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टीव्ह बिंग यांनी सोमवारी 1 वाजण्याच्या सुमारास लॉस एंजलिसमधील सेच्युरीसिटीमध्ये एका लग्जरी अपार्टमेंटच्या 27 व्या मजल्यावरून उडी मारली. त्यांच्या अचानक जाण्यानं हॉलिवूडमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. स्टीव्ह 55 वर्षांचे होते आणि गेल्या काही काळापासून ते डिप्रेशनमध्ये होते अशीही माहिती आहे.

स्टीव्ह बिंग जेव्हा एलिझाबेथ हर्लेसोबत रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा त्यांची खूप चर्चा झाली होती. एलिझाबेथही त्यांच्या जाण्यानं दु:खी आहे. हे कपल कायमच एकत्र दिसत असे. स्टीव्हच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर द पोलर एक्सप्रेस, बिओवपुल्फ अशा काही सिनेमांची त्यांनी निर्मिती केली आहे. द पोलर एक्सप्रेसमध्ये त्यांनी 80 मिलियनहून अधिकची गुंतवणूक केली होती.