ब्लड प्रेशरचा घरगुती उपाय : BP कंट्रोल ठेवण्यासाठी करा ‘हे’ 10 सोपे आणि स्वस्त उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ब्लड प्रेशर BP एक सामान्य समस्या आहे. याची अनेक कारणे आहेत. निरोगी जीवनासाठी ब्लड प्रेशर नॉर्मल असणे खुप आवश्यक आहे. अन्यथा हृदयरोग, स्ट्रोक आणि किडनीचे आजार होण्याचा धोका असतो. ब्लड प्रेशरमध्ये BP लोक तात्काळ अ‍ॅलोपॅथीक औषध घेतात, परंतु यामुळे साईड इफेक्ट्स सुद्धा आहेत. दुसरीकडे काही घरगुती उपाय आहेत जे करून यावर नियंत्रण मिळवू शकता.

कानातील संसर्गाकडे दुर्लक्ष नका करू, ‘हे’ घरगुती उपाय देवू शकतात दिलासा

हे उपाय करा
– रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून प्या.
– लसून सेवन केल्याने रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. ज्यामुळे ब्लड प्रेशरसह कोलेस्ट्रॉल सुद्धा कंट्रोल राहते.
– रोज रिकाम्यापोटी नारळपाणी प्या. यामुळे हाय ब्लड प्रेशरची BP समस्या दूर होते.
– लो ब्लड प्रेशरची समस्या असेल तर दिवसात दोनवेळा एक कप बीट ज्यूस प्या.
– मीठाचे प्रमाण कमी करा.
– ऑफिस आणि घरात लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा, रोज व्यायाम करा.
– कोलेस्ट्रालचा स्तर नियंत्रित राहील असा आहार घ्या. सफरचंद, संत्रे, कांदा, ब्रोकली, मासे सेवन करा.

घरबसल्या ‘या’ पध्दतीनं करा बॉडी पॉलिशिंग, पार्लर सारखा ग्लो मिळेल, जाणून घ्या

– गहू आणि चण्याचे पीठ समप्रमाणात घेवून चपाती बनवा, चावून-चावून खा. पीठातून कोंडा काढू नका.
– ब्राऊन राईसचे सेवन करा. यात मीठ, कोलेस्टरोल आणि चरबी कमी असते.
– मुळा शिजवून किंवा कच्चा खा. यातून मिनरल्स, पोटॅशियम मिळते.
– आळशीचे सेवन करा. यात एल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड आढळते. कोलेस्ट्रॉल मी असते. ब्लड प्रेशर कमी होते.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय