कोरड्या केसांच्या समस्येनं त्रस्त आहात ? जाणून घ्या ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   प्रदूषण, शॅम्पूचा वाढता वापर, फास्ट फूडचं जास्त सेवन यामुळं कोरड्या केसांची समस्या येते. यासाठी काही घरगुती उपाय देखील केले जाऊ शकतात ज्याचे कोणतेही साई़ड इफेक्ट्स देखील होत नाहीत. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) अंडी, दही आणि मध – यासाठी पुढीलप्रमाणं कृती करा.

– 2 अंडी फोडून घ्या
– यात 2 चमचे दही मिक्स करा
– यात एक चमचा मध घाला
– याची चांगली पेस्ट तयार करून ती केसांना लावा.
– 30 मिनिटे ठेवल्यानंतर केस साध्या पाण्यानं धुवून घ्या.

2) गरम तेलाचं मिश्रण – यासाठी पुढीलप्रमाणं कृती करा.

– यासाठी 2 चमचे बदाम तेल घ्या
– यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करा.
– यानंतर यात 2 चमचे खोबरेल तेल टाका.
– तयार मिश्रण कोमट करून घ्या
– आता या तेलानं मसाज करा.
– यानंतर केस टॉवेलनं बांधून ठेवा
– काही वेळानंतर केस शॅम्पूनं स्वच्छ धुवून घ्या.

3) अंड्याचा बलक आणि पाणी – यासाठी पुढीलप्रमाणं कृती करा.

– 2 अंड्याचे बलक घ्या
– यात 3 चमचे पाणी घाला
– हे मिश्रण नीट एकत्र करा
– 30 मिनिटे हे मिश्रण केसांना लावा.
– यानंतर साध्या पाण्यानं केस धुवून घ्या.

4) मध आणि व्हेजिटेबल ऑईल – यासाठी पुढीलप्रमाणं कृती करा.

– 2 चमचे मध घ्या
– यात 2 चमचे व्हेजिटेबल ऑईल टाका.
– आता तयार पेस्ट केसांना लावा.
– 15 मिनिटांनंतर केस शॅम्पूनं स्वच्छ धुवून घ्या.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.