Home Remedies : ‘वजन’ कमी करण्यासाठी ‘या’ 5 घरगुती उपायांचे करा अनुसरण

पोलीसनामा ऑनलाईन : बरेच लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. काही डायटिशियनला फॉलो करतात तर काही जिममध्ये जाऊन घाम गाळतात. वजन वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यात बसल्या बसल्या काहीतरी खात राहणे, व्यायाम न करणे, अधिक चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे, यामुळे वजन वाढते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे आणि थोडी मेहनत घेतली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला असे घरगुती उपचार सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही वजन कमी करू शकता. यामध्ये केवळ थोडा आहार बदलण्याची गरज आहे.

– सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहील. आपण लिंबाचे पाणी किंवा साधे कोमट पाणी पिऊ शकता यामुळे चरबी जलद गतीने कमी होईल.

– वजन कमी करण्यासाठी ग्रीन-टी चे सेवन देखील चांगले आहे. दिवसातून सुमारे 3-4 कप ग्रीन टी प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. चरबी कमी होते आणि यामुळे अन्नाचे पचन देखील चांगले होते.

– एक चमचा सफरचंदाचे व्हिनेगर आणि थोडी दालचिनी एकत्र करुन सेवन केल्यास वजन कमी करता येते.

– संध्याकाळी पत्ताकोबीचे ज्यूस प्यावे. यापासून देखील वजन कमी करता येते.

– आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा. आहारात जितके जास्त फायबर घ्याल, तितक्या वेगाने वजन कमी करण्यास तुम्ही सक्षम व्हाल.