‘लूज मोशन’मुळं त्रस्त आहात ? आराम मिळवण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ 3 सोपे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  काहींना बाहेरचं खाल्ल्यानंतर किंवा अचानकच लूज मोशनचा त्रास होतो. यालाच मेडिकल भाषेत डायरिया म्हटलं जातं. याची कारणं आणि यावर काही घरगुती उपाय, तसेच आपण कोणती काळजी घ्यायला हवी किंवा कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात यासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत.

काय आहेत डायरियाची कारणं ?

– व्हायरल इंफेक्शन
– बॅक्टेरियल इंफेक्शन
– एखाद्या पदार्थाच्या सेवनानं अॅलर्जी होणं
– फूड पॉईजनिंग
– काही खाल्ल्यानंतर किंवा पिल्यांतर इंफेक्शन होणं
– ताण-तणाव
– दूषित पाणी पणं

‘हे’ सोपे उपाय करा ?

लूज मोशन किंवा डायरियाचा त्रास झाल्यास घरीच सहज आणि सोपे उपाय केले जाऊ शकतात. खास बात अशी की याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. घरगुती उपाय केल्यानंतर तुम्हाला दोनच दिवसात आराम मिळू शकतो.

1) इलेक्ट्रोल पावडर किंवा साखर-मिठाचं पाणी – लूज मोशनचा त्रास झाला की, शरीरातील पाणी आणि गरजेचे मिनरल्स बाहेर पडतात. यामुळं कमजोरी जाणवते. यामुळं शरीर डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तुम्ही इलेक्ट्रोल पावडर पाण्यात टाकून सेवन करू शकता. हे नसेल तर तुम्ही 1 ग्लास पाण्यात 1 चमचा साखर आणि चिमुटभर मिठ टाकून हे मिश्रण पिऊ शकता. दिवसभरात थोडं थोडं याचं सेवन केलं जाऊ शकतं.

2) दही – लूज मोशनवर हा रामबाण उपाय मानला जातो. कारण यात प्रोबायोटीक भरपूर प्रमाणात असतात. यातील प्रोबायोटीक बॅक्टेरिया शरीरातील इंफेक्टेड बॅक्टेरियासोबत लढून त्यांना शरीरातून बाहेर काढतात. यामुळं डायरिच्या समस्येपासून आराम मिळतो.

3) केळी आणि बटाटा – लूज मोशनवर आणखी एक चांगला उपाय म्हणजे पोटॅशियमयुक्त पदार्थ. अशा पदार्थांच्या सेवनानंही लूज मोशनपासून आराम मिळतो. यासाठी तुम्ही केळी किंवा बटाट्याचं सेवन करू शकता. केळ्यामध्ये पोटॅशियमसोबतच इलेक्ट्रोलाईट्सही असतात. याचा फायदा लूज मोशनमध्ये होणारं शरीराचं नुकसान भरून काढण्यासाठी होतो. बटाटा उकडूनही तुम्ही त्याचं करू शकता.

काय करणं टाळायला हवं ?

लूज मोशन झाल्यानंतर काय काय खायला किंवा प्यायला हवं याची तर आपण माहिती घेतली आहे. परंतु कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हेही माहिती असणं महत्त्वाचं आहे. नाही तर याचा काहीही फायदा होणार नाही. डायरिया झाल्यास पुढे सांगितल्या प्रमाणे काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे.

– फायबरयुक्त पदार्थ किंवा फळांचं सेवन करणं टाळायला हवं.
– सफरचंद, आलुबुखारा, जांभळं अशी फळं खाणं टाळा.
– दूधासह इतर डेअरही प्रॉडक्ट्स टाळावेत.
– पनीर किंवा चीज असे पदार्थही खाणं टाळावं.