पोलिसाच्या ‘प्रामाणिक’पणाला तरूणानं ठोकला ‘सॅल्यूट’, ‘वर्दी’तील माणसानं मन जिंकलं अन् युवक भारावला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ट्रॅफिक पोलीसानाबद्दल समाजात अनेक नकारात्मक भावना आहेत. मात्र, सावनेर येथील एका शेतकरी पुत्रास पोलिसाच्या इमानदारीचा वेगळा अनुभव पाहायला मिळाला. त्याने आपला हा अनुभव फेसबुकवर शेअर केला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर पंचायत समिती विभागातील नरेंद्र सूर्यवंशी याने जय हिंद म्हणत पोलिसांच्या प्रामाणिकतेला सलाम केला आहे.

दरम्यान, सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु असल्याने तहसिलची पार्कींग नरेंद्र यांच्या कार्यालयासमोर होती. सोबतच कार्यकर्त्यांची अन् पोलिसांची पार्कींगही कार्यालयाजवळ करण्यात आली. संध्याकाळी जेव्हा नरेंद्र आपल्या ऑफिसवरुन घरी निघाले, त्यावेळी त्यांच्या गाडीचे इंडिकेटर तुटल्याचं त्यांना दिसून आलं. हे पाहूनच नरेंद्र संतापले, त्यावेळी बाजुलाच असलेल्या पवन नावाच्या त्यांच्या मित्राने घडलेली घटना सांगितली. त्याने सांगितले कि, तुमच्या गाडीला एका पोलिसवाल्याच्या गाडीचा धक्का लागला. त्यावेळी, हे इंडिकेटर तुटले. तुम्हाला या इंडिकेटरचे पैसे देण्यासाठी तो पोलिसवाला आजू-बाजुला पाहत होता. पण, तुम्ही जेवण करायला गेले असाल, असे पवनने सांगितले.

पवनने घटना सांगितल्यानंतर नेरंद्र यांनी पुन्हा पोलिसाला मनात शिव्या घालत गाडी गॅरेजकडे नेली. त्यावेळी, तुटलेले इंडिकेटर बाहेर काढले असता नरेंद्रला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, ज्या पोलिसाकडून गाडीचे इंडिकेटर तुटले होते, त्या पोलिसाने इंडिकेटरच्या आतमध्ये एका कागदात चाळीस रूपये एका कागदात गुंडाळून ठेवले होते. घटनेच्या वेळी त्या पोलिसवाल्या व्यक्तीस गाडी मालक मिळाला नसल्याने त्याने ही नुकसान भरपाई त्या इंडिकेटरमध्ये ठेवली. या पोलिसाच्या इमानदारीचा अनुभव आल्यानंतर नरेंद्रने पोलिसाला सॅल्यूट ठोकला. तसेच, त्याने हा प्रसंग फेसबुकवर शेअर करत, ‘सर किंमत त्या पैशाची नाही, आपण दाखवलेल्या त्या ईमानदारीची आणि वर्दी चढवतांना घेतलेल्या शपथेची होती. तुम्ही तुमचा नंबर द्यायला हवा होता, जर तुम्हाला हा मेसेज मिळाला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद, असे लिहीत, शेवटी, ‘सच्चा पोलिसवाला, जय हिंद ! सर… असेही नरेंद्र यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/