जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटलांचा चांगल्या कामाबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) –  पुरंदर तालुक्यातील पोलीस पाटलांनी सन २०१९ च्या लोकसभा आणि विधान सभा निवडणूक प्रसंगी तसेच सध्या सुरू असलेल्या कोवीड१९ संकटात केलेल्या कामगिरीबद्दल पुरंदर भोरचे उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटलांच्या कामाची दखल घेत त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.

जेजुरी पोलीस स्टेशन येथे पुढे येणाऱ्या विविध सण व समारंभाच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या कायदेशीर उपाय योजना संदर्भात जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पुढील काळात राम मंदिर बांधकाम शुभारंभ, बकरी ईद, गणेशोत्सव व गोकुळाष्टमी या विविध सणांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करावयाचे उपाय योजना याबत चर्चा करण्यात आली. जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अंकुश माने यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

या बरोबर तालुक्यातील पोलीस पाटलांनी २०१९ च्या निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट कामा बद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले सन्मानपत्र पोलीस पाटलांना जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते देण्यात आले. केले. या बोलताना एपीआय अंकुश माने म्हणाले की, जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस पाटलांचे काम उल्लेखनीय आहे त्यांच्या सहकार्यामुळेच या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधितल राखण्यासाठी आम्हाला मोठी यश आले. त्याचबरोबर त्यांचे कोवीड १९ च्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा मोठे सहकार्य लाभले
पोलीस पाटील संघटनाचे कार्याध्यक्ष मोहन इंगळे यांनी तालुका पोलीस प्रशासनाने पोलीस पाटलांवर विश्वास दाखवला व कामाची जबाबदारी दिली. त्याचबरोबर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळाली, यापुढे ही प्रशासनाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी सर्व पोलीस पाटील सदैव तत्पर असतील असे सांगितले.