आजचे राशीभविष्य : ‘या’ 7 राशींचे ‘भाग्य’ उजळेल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – तुमच्या घरी आजचा दिवस खुप कमजोर राहणार आहे. चिंता वाढेल, आणि खर्चही वाढेल. सुख-सुविधांसाठी एवढा खर्च कराल की, नंतर आवश्यक गोष्टींसाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न पडेल. कामात एखाद्याशी वादविवाद होऊ शकतात. कुटुंबाचे वातावरणही खास राहणार नाही. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. भाग्याच्या आधाराने काही कामे होतील.

वृषभ
तुमचा आजचा दिवस मस्त जाणार आहे. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीशी चांगले संबंध होतील आणि प्रेमात वाढ होईल. आनंद होईल. वैवाहिक जीवनात तणाव आणि संततीच्या बाबतीत चिंता सतावेल. भाग्याची साथ मिळेल परंतु, कुटुंबाच्या दबावामुळे काही निर्णय बदलावे लागतील. कामासाठी आजचा दिवस चांगला राहिल. आरोग्य चांगले राहिल. आजारापासून सुटका होईल.

मिथुन
आजचा दिवस तुम्ही कुटुंबियांसोबत घालवाल. कुटुंबात सुख शांती राहिल. सर्व प्रेमाने राहतील. कामातही चांगले परिणाम दिसतील. तुमचे कौतूक होईल. परंतु तुमच्या सोबत काम करणारे षडयंत्र रचू शकतात. यासाठी सावध रहा. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला राहिल. प्रेमसंबधासाठी दिवस सामान्य आहे. भाग्याची साथ कमी मिळेल.

कर्क
आज तुम्ही कोणत्या तरी नवीन कामाची सुरूवात कराल. प्रवासासाठी दिवस शुभ आहे. एखादी शुभवार्ता मिळेल, ज्यामुळे कुटुंबात आनंद निर्माण होईल. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. जोडीदाराच्या स्वभावामुळे वाद होऊ शकतो. खर्च वाढू शकतो. विरोधकांपासून सावध रहा. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामात तुमच्या मेहनतीची पद्धत लोकांना आवडेल, कौतूक होईल.

सिंह
आज तुम्ही काहीतरी खास नियोजन कराल, ज्यामुळे उत्पन्न वाढेल आणि जवळच्या लोकांना मिळण्याची संधी मिळेल. सासरच्या लोकांशी भेट होईल. प्रेमसंबंधात निराशा होऊ शकते, परंतु वैवाहिक जीवनात जोडीदार मनातील गोष्टी व्यक्त करेल ज्यामुळे तुम्ही त्याचे मन जाणून घेऊन शकता. कामात चढ-उतार राहिल.

कन्या
आज तुमच्यात भरपूर आत्मविश्वास येईल, यामुळे कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण कराल. कामात बुद्धीमत्ता उपयोगी पडेल आणि काम सोपे होईल. आज एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. कुटुंबात सुख शांती राहिल. प्रेमसंबंधात आज तणाव वाढेल आणि प्रिय व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे. खर्च सामान्य राहिल. प्रेम तुमच्या वैवाहिक जीवनाचा आधार होईल आणि जोडीदाराकडून तुम्हाला सुख मिळेल.

तुळ
आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण आजचा दिवस खुपच कमजोर राहणार आहे. आर्थिक स्थितीवर जोर येईल आणि तुम्ही त्रस्त होऊ शकता. मानसिक ताण राहिल. आरोग्य कमजोर राहिल. छातीत दुखू शकते. कुटुंबातील वातावरण चांगले राहणार नाही. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस ठिक आहे. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण येतील.

वृश्चिक
आज तुम्हाला अनेक फायदे होणार आहेत. तुमचे उत्पन्न वाढेल आणि कलेच्या संबंधित चांगले काम कराल. कुटुंबातील वातावरण चांगले राहिल आणि लोकांशी चर्चा होईल. त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेता येतील. प्रवासात समस्या येऊ शकतात. धनप्राप्तीसाठी दिवस एकदम चांगला आहे. आरोग्य मात्र कमजोर राहिल. वैवाहिक जीवन चांगले राहिल. तर प्रेसंबंध खुपच चांगले राहतील.

धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अचानक तुमच्या कामात चांगली बातमी ऐकायला मिळेल. चांगल्या कामाचे फळ मिळेल. आरोग्य ठिक राहिल. आज तुम्ही थोडे गंभीर राहू शकता. ज्यामुळे तुम्ही काम चांगल्या प्रकारे पार पाडू शकता. वैवाहिक जीवनात तणाव राहिल. कौटुंबिक जीवन चांगले राहिल. घरात सुख आणि प्रेम मिळेल. प्रेमसंबंधात आजचा दिवस चांगला आहे. कोणाबद्दल वाईट बोलू नका.

मकर
आजच्या दिवशी आरोग्याकडे पूर्ण लक्ष द्या. व्यापाराच्या बाबतीत आजचा दिवस जबरदस्त आहे. लांबचा प्रवास करण्याचा योग आहे, ज्यामुळे तुमचा व्यापार वाढविण्यास मदत होईल. आज चांगले परिणाम दिसून येतील. जोडीदाराकडून लाभ होईल. वैवाहिक जीवनात चढ-उतार असला तरी दिवस चांगला जाईल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. परंतु एखादा मित्र भेटल्याने दिवस चांगला जाईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहिल. नोकरीत सहकार्‍यांना चांगली मदत कराल.

कुंभ
आज तुम्हाला समस्या घेराव घालतील, यामुळे कोणतेही काम पूर्ण लक्ष देऊन करता येणार नाही. तरीसुद्धा तुमची बुद्धी तीव्र राहिल्याने व्यापाराला नवी दिशा देऊ शकता. आरोग्य कमजोर राहिल. दुखापत होऊ शकते. यासाठी काळजी घ्या. उत्पन्नात वाढ होईल आणि धनप्राप्तीबाबत चांगली वार्ता समजेल. कुटुंबातील वातावरण सुखद राहिल. एखादे चांगले काम होऊ शकते. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. नोकरीत बॉसचे मार्गदर्शन मिळेल, त्यांचे ऐकल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

मीन
आज वैवाहिक जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल. नात्यातील प्रेम वाढेल. व्यापारासाठी सुद्धा आजचा दिवस खुप चांगला आहे. परदेशातील व्यापारातून लाभ मिळू शकतो. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमचे उत्पन्न वाढेल. कुटुंबातील वातावरण थोडे कमजोर राहिल. प्रेमसंबंधात निराशा होऊ शकते.