लासलगाव मध्ये घरफोडी, 2 लाख 12 हजारांचा ऐवज लंपास

लासलगाव : येथील श्रीराम नगर येथून राजेश श्रावण जावरे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की श्रीराम नगर येथील रहिवासी राजेश श्रावण जावरे यांच्या राहत्या घरातून दिनांक १४ ऑगस्ट रात्री ८ वाजे नतंर ते १५ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाच्या वरील कुलूप उडत घरामध्ये प्रवेश केला. या चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट उघडत ६९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २० भार वजनाचे चांदीचे जोडवे, पैंजण असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार वातावरण तयार झाले

राजेश श्रावण जावरे हे चांदवड पंचायत समितीमध्ये पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात मध्ये भादवी कलम ४५७,३८० अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणेे तपास करीत आहे