महागड्या क्रिम आणि स्क्रब सोडा ! सुंदर त्वचेसाठी वापरा ‘हे’ 3 सोपे घरगुती ‘स्क्रब’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकजण सुंदर त्वचेसाठी महागडं स्क्रब वापरत असतात. परंतु घरच्या घरी आपण स्क्रब करून सुंदर त्वचा मिळवू शकतो. आज आपण काही घरगुती स्क्रबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

1) बेसन-हळद स्क्रब – यासाठी पुढीलप्रमाणे क्रिया करा.

– 1 चमचा हळद आणि 1 चमचा बेसन घ्या. किंवा गरजेनुसार प्रमाण तुम्ही घेऊ शकता.
– यात दुधाची साय मिक्स करा.
– तयार मिश्रण चेहऱ्याला लावा
– चेहरा सुकल्यानंतर हलक्या हातानं मसाज करत हा पॅक काढा. किंवा तुम्ही थेट पाण्यानं चेहरा धुवू शकता.

– आता चेहरा कोमट पाण्यानं धुवून टाका.

2) मुल्तानी माती स्क्रब – हिवाळ्यात अंघोळीपूर्वी याचा वापर केल्यास जास्त फायदा होतो. यानं त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. तुम्ही हे मिश्रण हात आणि पायांसाठीही वापरू शकता. या स्क्रबसाठी पुढीलप्रमाणे क्रिया करा.

– गरजेनुसार मुल्तानी माती घ्या
– यात बदामाचं तेल आणि गुलाबजल टाका (आवश्यकतेनुसार)
– आता हे मिश्रण नीट एकत्र करा
– तयार मिश्रण चेहऱ्याला लावा.
– 30 मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

3) मसूर डाळ स्क्रब – या स्क्रबनं चेहरा मऊ होतो आणि कोरडेपाणा दूर होतो. या स्क्रबसाठी पुढीलप्रमाणे क्रिया करा.

– 2-3 चमचे किंवा गरजेनुसार मसूर डाळ घ्या.
– यात अर्धा कप किंवा योग्य प्रमाणात दूध टाका.
– एक तास हे मिश्रण असंच ठेवा
– डाळ फुगल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करा.
– आता ही पेस्ट चेहऱ्याला लावा
– 30 मिनिटांनी किंवा सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका.