मासिक पाळीदरम्यान पिंपल्स येतात ? त्वचा कोरडी किवा तेलकट पडते ? जाणून घ्या ‘या’ 5 सोप्या टीप्स

पोलीसनामा ऑनलाइन – मासिक पाळीच्या आधी किंवा दरम्यान काही महिला किंवा मुलींना पिंपल्स येण्याची समस्या उद्भवते. या दिवसात त्वचेच्या काही समस्याही जाणवत असतात जसे की, त्वचा तेलकट होणं किंवा कोरडी पडणं. आज आपण यासाठी काही टीप्स जाणून घेणार आहोत.

1) मॉईश्चराईजर लावा – अ‍ॅस्ट्रोजनची लेवल मासिक पाळी दरम्यान कमी झाल्यानं त्वचा कोरडी पडते. त्वचेवर सुरकुत्याही येतात. अशात या दिवसांमध्ये त्वचेला मॉईश्चरायजर लावा. जास्तीत पाणी प्या.

2) स्क्रब करा – त्वचा कोरडी पडत असे तर तुम्ही गरम पाण्याची वाफही घेऊ शकता. यामुळं काळे डाग जाण्यासही मदत होते. या दिवसात स्क्रब करूनही तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठी घरीच अनेक स्क्रब बनवता येतात.

3) आहार – या दिवसातील त्रास कमी करायचा असेल तर यासाठी पौष्टीक आणि संतुलित आहार घ्या. हिरव्या भाज्या, फळांचं सेवन करां. ज्यामध्ये ओमेगा 3 आहे त्या पदार्थांचाही आहारात समावेश असू द्या.

4) फेसवॉशनं चेहरा अधून मधून धुवत रहा – या दिवसात शरीरात इस्टोजनचं उत्पादन झाल्यानं त्वचेचं अतिरीक्त तेल बाहेर पडतं. यामुळं त्वचा तेलकट होते. असं झाल्यास फेसवॉशनं अधून मधून चेहरा धुत रहा.

5) हा फेस पॅकही फायेदशीर – जर या दिवसात त्वचा पिवळी पडत असेल तर चंदन, बेसन, हळद आणि दूध एकत्र करून फेस पॅक तयार करा. आणि हा पॅक चेहऱ्यावर लावा. यानंही त्वचा चांगली राहिल.