Bank Jobs 2020 : बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधारक तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बँक ऑफ बडोदा पदवी धारक तरुणांसाठी भरती सुरू झाली आहे. ही भरती बिझिनेस हेडच्या पदांवर केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार १५ डिसेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, कृपया पात्रतेशी संबंधित सर्व आवश्यक माहितीसाठी अधिकृत सूचना वाचा.

बँक ऑफ बडोदा भर्ती २०२० महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची प्रारंभ तारीख – २५ नोव्हेंबर २०२०

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १५ डिसेंबर २०२०

तपशीलवार अधिसूचनाची लिंक खाली दिली आहे.

https://www.bankofbaroda.in/writereaddata/Images/pdf/Detailed-Advertisement-Recruitment-of-Business-Heads-Final-25-11-2020.pdf

बँक ऑफ बडोदा भर्ती २०२० पदे

एकूण पदांची संख्या – ७ पदे

१)रोख व्यवस्थापन प्रमुख – १ पद
२)गृह कर्ज आणि तारण विभाग प्रमुख – १ पद
३)शैक्षणिक कर्ज विभाग प्रमुख – १ पद
४)लोन अगेंस्ट सिक्योरिटीज- १ पद
५)फिनटेक आणि डिजिटल लिडिंग हेड – १ पद
६)ग्राहक अनुभव प्रमुख – १ पद
७)पुरवठा साखळी वित्त प्रमुख – १ पद

बँक ऑफ बडोदा भर्ती 2020 शैक्षणिक पात्रता

एआईसीटीई किंवा भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात बॅचलर डिग्री. ज्या उमेदवारांना एमबीए / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा व्यवस्थापन पदवी किंवा त्या समतुल्य पात्रता असेल अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही व्यावसायिक बँक / एनबीएफसीमध्ये काम करण्याचा किमान १० वर्षांचा अनुभव.

बँक ऑफ बडोदा भरती २०२० साठी वयोमर्यादा

प्रमुख पदासाठी अर्ज करणारे उमेदवार ३० वर्षांपेक्षा कमी नसावेत आणि कमाल वय ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

बँक ऑफ बडोदा भरती २०२० साठी अर्ज कसा करावा

अर्ज करू इच्छित उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून १५ डिसेंबर २०२० पर्यंत किंवा त्या आधी अर्ज करू शकतात. उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे. जीडी, मुलाखत इ. साठी नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारे कॉल लेटर पाठविले जातील.

You might also like